श्री धुतपापेश्वर चरण सेवा मंडळ राजापूर यांचे वतीने सागर खडपे यांचे संकल्पनेतून श्रीदेव धुतपापेश्वर मुख दर्शन थेट प्रक्षेपण सेवेला भक्तगणांचा उदंड प्रतिसाद
रत्नागिरी प्रतिनिधी -श्री धुतपापेश्वर चरण सेवा मंडळ राजापूर यांचे वतीने सागर खडपे यांचे संकल्पनेतून श्रीदेव धुतपापेश्वर मुख दर्शन थेट प्रक्षेपण राजापूर जवाहर चौक येथे दरवर्षीप्रमाणे करण्यात येते व यावर्षीही करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही श्री धुतपापेश्वर मंदिर धोपेश्वर येथे महाशिवरात्री उत्सव सहा दिवस संपन्न झाला, महाशिवरात्री मुख्य उत्सवादिवशी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत राजापूर शहरातील जवाहर चौक येथे ज्या भाविकांना धुतपापेश्वर येथे जाऊन दर्शन घेता येत नाही अशा भाविकांना श्रीदेव धुतपापेश्वर मुख दर्शन थेट प्रक्षेपण मोठ्या टिव्ही च्या माध्यमातून करण्यात येते यावेळी प्रत्यक्ष धुतपापेश्वर मुख दर्शन न घेऊ शकणारे भाविक याठिकाणी धुतपापेश्वर मुख दर्शन घेऊन फुले व फळे भक्ती भावाने वाहत असतात व आयोजकांना आशिर्वाद देत असतात हि फुले व फळे सेवेकरी धुतपापेश्वर देवस्थानापर्यंत पोच करतात.
श्री देव धुतपापेश्वर मुख दर्शन थेट प्रक्षेपणाचे उद्घाटन राजापूर नाटे पोलिस निरीक्षक अशोक खेडकर सर राजापूर तहसीलदार मा.विकास गंबरे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून व रिमोटच्या माध्यमातून टिव्ही थेट प्रक्षेपण करण्यात आले.
यावेळी राजापूर जवाहर चौकात वैभव कोळेकर व आदिती खडपे यांनी उत्कृष्ट रांगोळी काढली होती.
या धुतपापेश्वर मुख दर्शन थेट प्रक्षेपणासाठी सागर खडपे, संतोष साईल, सौ.क्षितीजा साईल, प्रफुल्ल सावंत, संदिप पूजारी, संजय ओगले, प्रकाश आमकर, संदेश टिळेकर, प्रकाश कातकर, प्रकाश बांदिवडेकर, लवेश बाईत, माजी सैनिक मधुकर तांबे, उल्हास खडपे, विजय पटेल, रविकांत भामत, शैलेश तोडणकर, सुनील पवार पोलीस निरीक्षक चिपळूण, खलिल मुजावर, स्वप्नील सोडये, आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment