महाकुंभ स्नान ज्ञात अज्ञात शहिदांसाठी

 



ठाणे : प्रयागराज येथे तब्बल ११४ वर्षांनंतर होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात अनेक जण स्नान करण्यासाठी सहभागी झालेत त्यापैकी कुणी वैयक्तिक पापक्षालनासाठी, तर कुणी आपल्या माता पित्यांना घेऊन कुंभ स्नान करत आहेत. पण संग्राम फाऊंडेशन आणि जयहिंद अभियानाचे पदाधिकारी मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना कुंभ स्नानाचे पुण्य मिळवून देण्यासाठी या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत.

यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना संग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि जयहिंद अभियानाचे संचालक गोपाल सिंह म्हणाले, २७ फेब्रुवारीरोजी क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले होते.  चंद्रशेखर आझाद यांच्यावर ज्या ठिकाणी कमला नेहरू यांनीं अंत्यसंस्कार केले त्याठिकाणी जयहिंद अभियानाचे सल्लागार आणि जेष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल . यावेळी चंद्रशेखर आझाद पुरस्काराने काही नामवंतांना गौरविण्यात येईल. चंद्रशेखर आझाद यांच्या वंशात आता कुणीच राहिलेले नाही. त्यामुळे चंद्रशेखर आझाद यांना महाकुंभ स्नानाचे पुण्य मिळावे म्हणून आम्ही चंद्रशेखर आझाद यांची प्रतिमा असलेले फलक घेऊन त्रिवेणी संगमात स्नान करणार आहोत. यावेळी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांची नावेही घेतली जाणार आहेत.

जयहिंद अभियानाचे सचिव दिपककुमार त्रिपाठी म्हणाले या अभियानाच्या माध्यमातून हुतात्म्यांना योग्य तो मानसन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. चंद्रशेखर आझाद आणि इतर हुतात्म्यांना भारत रत्न किताबाने सन्मानित करावे याकरता शासनदरबारी आम्ही प्रयत्न करतो आहोत. याशिवाय पुढच्या पिढीला या हुतात्म्यांची ओळख रहावी म्हणून महामार्ग, किंवा इतर शासकीय आस्थपनाना त्यांची नावे देण्यात यावी अशी मागणी आहे. यावेळी जयहिंद अभियानाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र प्रजापती, राष्ट्रीय संघटक पृथ्वीराज चौहान,   विजय मौर्य, सुरेश यादव, जयवंत सावंत, घनश्याम मिश्रा, हरेंद्र यादव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत