आरोग्य विभाग
वृत्तपत्र टिपणी
नागरीकांसाठी किटकजन्य आजारांबाबत विशेष शिबीरांचे आयोजन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मा. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप / डेंगी आजारांबाबत जनजागृती होणे करीता जाहिर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत विविध ठिकाणी जाहिर शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रमाणे गणेशोत्सव कालावधी, नवरात्रोत्सव कालावधी मध्ये हिवताप / डेंगी आजाराबाबत जनजागृती होणे करीता विषेश शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. अत्तापर्यंत एकुण 290 शिबिरांकरीता एकुण 128688 नागरीकांनी भेट दिली असुन एकुण 11644 नागरीकांचे रक्तनमुने घेण्यात आले असता, तपासणी अंती सदरचे रक्तनमुने Negative असल्याचे आढळुन आले आहेत.
त्याअनुषंगाने कार्यक्षेत्रात जास्तीच जास्त नागरीकांपर्यंत पोहोचुन जनजागृती करणेकरीता दि. 05/12/2024 रोजी खालील प्रमाणे विशेष जाहीर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
अ.क्र | ना प्रा आ केंद्र | दिनांक 05/12/2024 |
1 | सी बी डी | भूखंड क्र. 75/76,(बांधकाम)सेक्टर -15,सिबिडी. |
2 | करावे | श्रेयस सोसायटी, से.२३, नेरुळ. |
3 | से-48 | विठ्ठल मंदिर, सेक्टर ४८, सिवूड. |
4 | नेरुळ 1 | एम्परिया बांधकाम, D-113, एम. आय. डी. सी, नेरुळ. |
5 | नेरूळ 2 | श्रीकांत म्हात्रे बिल्डींग,नेरूळगाव. |
6 | कुकशेत | रेजन्सी बांधकाम, सेक्टर-14 नेरुळ. |
7 | शिरवणे | रंधावा कंपनी, midc plot no70A , सेक्टर – 1. |
8 | सानपाडा | अश्वथा सोसायटी, सेक्टर 4. |
9 | तुर्भे | समता हिंदी विद्यालया शेजारी , शिवशक्ती नगर , तुर्भे स्टोअर. |
10 | पावणा | बॉम्बे एक्सपोर्ट(बांधकाम), पावणे एम.आय.डी.सी, गणेश नगर. |
11 | इंदिरानगर | Gama Up RMC plant, Rikonda, sanpada quari, Turbhe Quari. |
12 | जुहुगाव | अरिहंत बांधकाम (कैलास शिखर सो.), सेक्टर.९ वाशी. |
13 | वाशीगाव | मलनिस्सारण झोपडपट्टी, सेक्टर ३१(ए), वाशीगांव . |
14 | खैरणे | सेक्टर 8, नवी मुंबई महानगरपालिका दैनंदिन बाजार, भूखंड क्रमांक 40, कोपरखैरणे. |
15 | महापे | एकविरा झोपडपट्टी ,महापे एम.आय.डी.सी. |
16 | घणसोली | सेक्टर १६, मुरबादेवी मंदीर, घणसोली. |
17 | राबाडा | ज्ञानदीप दर्शन सोसायटी, सेक्टर - 7 ऐरोली. |
18 | कातकरीपाडा | आण्णा भाऊ साठे चौक,साईबाबा नगर. |
19 | ऐरोली | ऐरोली नाका, ऐरोली. |
20 | चिंचपाडा | शिवप्रेरणा चाली जवळचे शिवमंदिर. |
21 | दिघा | गणेश नगर, समाज मंदिर. |
22 | इलठणपाडा | सिद्धनाथ मंदिर, विजयनगर. |
23 | नेासीलनाका | डॉ कल्पना मढवी डिस्पेंसरी, मोरे वडापाव समोर, गोठवली गाव. |
24 | घणसोली से-4 | मुकांबीका मंदिर, सेक्टर २, घणसोली. |
25 | कोपरखैरणे, से-14 | सेक्टर 7, गणपती मंदिर, कोपरखैरणे. |
26 | कोपरखैरणे, से-16 | सेक्टर 16, लक्ष्मी मिनी मार्केट, कोपरखैरणे. |
उपरोक्त तक्त्यामध्ये नमुद ठिकाणी सर्व तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात येणार आहेत तसेच हिवताप / डेंग्यु या आजारांबाबत माहिती देण्यात येणार आहे. शिबिरांची वेळ सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 वाजे पर्यंत आहे.
हिवताप / डेंग्यु आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरीकांच्या प्रत्यक्ष सहभागाची आवश्यकता असुन, नमुंमपा कार्यक्षेत्रातील नागरीकांनी शिबिरांचा लाभ घ्यावा व ताप असल्यास रक्ताची तपासणी करुन घ्यावी तसेच हिवताप / डेंग्यु आजाराबाबत माहिती घ्यावी असे आवाहन मा. आयुक्त, डॉ. कैलास शिंदे, यांनी केले आहे.

Post a Comment