नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाणी पुरवठा देयके भरण्यासाठी क्यू आर कोड सुविधा कार्यन्वित
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना पाणी देयके भरण्याकरिता ऑनलाईन क्यू आर कोड पेमेंट सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. परंतू काही तांत्रिक कारणामुळे क्यू आर कोडव्दारे पाणी देयकांचा भरणा करण्यात नागरिकांना अडचणी येत होत्या.
या अनुषंगाने तत्पर कार्यवाही करीत तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे नमुंमपा क्षेत्रातील नागरिकांना पाणी देयके भरण्याकरीता दि. 04 डिसेंबर 2024 पासून क्यू आर कोड पेमेंट सुविधा पुन्हा उपलब्ध झालेली आहे.
याकरिता देयकांवरील क्यू आर कोड गुगल लेन्सने स्कॅन केल्यावर एक लिंक आपल्या स्क्रीनवर येईल. त्यावर क्लिक केले असता आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध असणा-या पेमेंट ॲपची यादी दर्शविली जाईल. त्यातून योग्य त्या ॲपची निवड करुन नागरिक सहजपणे पाणी देयके भरणा करु शकतात. त्यामुळे नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही विभाग कार्यालयात न जाता आहे त्या ठिकाणाहून आपले पाणी देयक भरणा करणे शक्य होत आहे.
याबाबतच्या अधिक माहितीसाठी अथवा अडचणीसाठी नमुंमपा पाणी पुरवठा विभागाशी 1800222309 अथवा 1800222310 या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध् आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पाणी देयके भरण्याकरिता ऑनलाईन क्यू आर कोड पेमेंट सुविधेचा लाभ घ्यावा.
Post a Comment