ठाण्यात मनसेने फोडला प्रचाराचा नारळ


ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मनसेचे जागोजागी जंगी स्वागत 



ठाणे  (प्रतिनिधी)   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी (ता.०४ नोव्हे.) सिडको बस स्थानकानजीकच्या श्री साईबाबा मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीला शेकडो महाराष्ट्र सैनिकांसह हजारो नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. आज अविनाश जाधव यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले. 

           ठाणे शहर विधानसभा मतदार संघातुन मनसेचे अविनाश जाधव जोमाने रिंगणात उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ब्लु प्रिंटनुसार अभिनव महाराष्ट्र घडवण्यासाठी ठाण्याचे युवा नेतृत्व अविनाश जाधव हे कटीबद्ध असुन त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीत तसेच समस्येला तोंड देण्यासाठी अविनाश जाधव नेहमीच तत्पर असतात. सोमवारी सिडको बस स्थानक येथील साईबाबा मंदिरात नारळ फोडुन त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.

मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

आम्ही गेल्या अनेक वर्षात केलेल्या कामांच्या जोरावर नागरिकाच्या घरापर्यंत जात आहोत. मतदारांच्या मतदानाचा अपमान झालेला आम्ही पहिला आहे. मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन यावेळी मनसेचे ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी यावेळी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत