कळवा (पूर्व) परीसरातील असंख्य उत्तर भारतीय पदाधिका-यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

 


उपमुख्यमंत्री ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्रामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षामधील कळवा (पूर्व) परीसरातील असंख्य उत्तर भारतीय पदाधिका-यांनी आज पंकज पांडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. 


यावेळी आनंद परांजपे म्हणाले कि, कोणत्याही दहशतीला न घाबरता पंकज पांडे आणि त्यांच्या सहका-यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नेहमी उत्तर भारतीयांचे शोषण केले असे देखिल ते म्हणाले. कळवा पूर्व परीसरामध्ये स्मशानभूमी उभारु शकले नाहीत. छटपूजा घाटाची निर्मिती करु शकले नाहीत. कायम सनातन धर्माचा अपमान करायच काम जितेंद्र आव्हाडांनी केल अस आनंद परांजपे म्हणाले. पंकड पांडे आणि त्यांच्या सहका-यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणखी ताकत वाढली आहे असे देखिल ते यावेळी म्हणाले. 


अहंकाराच्या विरोधात आम्ही करीत असलेले काम बघून पंकज पांडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचे मी स्वागत करतो असे वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केले. कळव्यामध्ये आव्हाडांकडून हिंदु मुस्लिम चे राजकारण करुन जातीवाद पसरवला जात असल्याचे देखिल ते यावेळी आव्हाडांचे नाव न घेता म्हणाले.   


यावेळी पंकज पांडे यांनी जितेंद्र आव्हाडांना उत्तर भारतीयांची मतं पाहीजेत पण उत्तर भारतीय नको हा कुठला न्याय अशा प्रकारचे विधान केले. तसेच आव्हाडांनी प्रभू श्री रामाबद्दल केलेल्या विधानाचा समाचार घेतला. १५ वर्षे आव्हाडांना साथ दिली पण, त्यांनी आमच्या लोकांसाठी काहीही केलं नाही. १५ वर्षे आमदार असून देखिल कळवा (पूर्व) परीसरामध्ये छठ पूजा घाटाची निर्मिती नाही करु शकले. फक्त आम्हांला आश्वासन दिले गेले. १५ वर्षात कळवा पूर्व परिसरासाठी स्मशानभूमीची निर्मिती नाही करु शकले. केवळ भाषणात आणि पुस्तकात आम्हांला आश्वासन दिले गेले. असे वक्तव्य पंकज पांडे यांनी केले.


याप्रसंगी मा. नगरसेवक प्रकाश बर्डे, मा. परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर, युवक जिल्हाध्यक्ष विरु वाघमारे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पंकज पांडे, राजू राजभर, अतुल शेडगे, संतलाल सिंह, अरविंद दुबे, राजेश सिंग, रोहीत यादव, सुरज सहानी, राकेश वर्मा, मिरा पाठक यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत