रोटरीचा दिव्यांगांना मदतीचा हाथ
ठाणे - रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या वतीने रोटरी दिव्यांग सेंटर कल्याण संचालित ऑटोसच्या सहकार्याने दिव्यांगांना कृत्रिम पाय व कॅलिपरचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांग व्यक्तींचे एक शिबिर रविवारी ठाण्यात संपन्न झाले. त्यात दिव्यांगांच्या पायाचे मोजमाप घेण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण अध्यक्ष बिजू उन्निथन, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ अध्यक्ष मेधा जोशी, सचिव रमेश मोरे, सचिव अमोल नाले, प्रकल्प प्रमुख प्रफुल क्षिरसागर, प्रकल्प प्रमुख देवयानी वेद यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले.
रोटरी क्लब सामाजिक भावनेतून गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबवित आहे. नौपाडा येथील सरस्वती शाळेच्या आवारात हे शिबिर संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांतून 52 दिव्यांगांनी नोंदणी केली होती. 40 दिव्यांग या शिबिरास उपस्थित होते. तज्ञ व्यक्तिंनी या दिव्यांगांच्या पायाचे मोजमाप घेतले. सरस्वती विद्यालयात 27 ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमात दिव्यांगांना कृत्रिम पाय व कॅलिपरचे वाटप करण्यात येणार आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी शिबिराला उपस्थिती लावत रोटरीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
Post a Comment