विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा करण्यात आली असून मा.भारत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीस सुरुवात झालेली आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांची विशेष आढावा बैठक घेत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
महाराष्ट्र राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होत असून आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स, फलक, होर्डींग अथवा कोणत्याही स्वरूपात लावलेल्या अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्याच्या कार्यवाहीचा विभागनिहाय आढावा घेतला. दोन्ही परिमंडळे व आठही विभाग कार्यालयांनी अतिक्रमण विभागाच्या सहयोगाने सदरची कार्यवाही अधिक गतीमानतेने व त्वरित पूर्ण करावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने करावयाच्या विविध बाबींचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, प्रशासन उपआयुक्त श्री.शरद पवार, निवडणूक उपआयुक्त श्री.भागवत डोईफोडे आणि इतर विभागप्रमुख व विभाग अधिकारी उपस्थित होते.
Post a Comment