माजी आमदार सुभाष भोईर यांच्या विशेष निधीतून सागाव नांदिवली खालचापाडा जलवाहिनीचे भूमिपूजन

 

 


डोंबिवली :- माजी आमदार सुभाष भोईर यांच्या विशेष निधीतून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सागाव नांदिवली खालचापाडा रविकिरण सोसायटी चेरा नगर परिसरात जलवाहिनी साठी महानगर पालिका क्षेत्रातील मुलभूत सोयी सुविधांचा विकास लेखाशिर्षांतगत १५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्याने रविकिरण सोसायटी, चेरा नगर परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार असून या परिसरातील नागरिकांचा पाण्याच प्रश्न सुटणार आहे. या कामाचे भूमिपूजन माजी आमदार सुभाष भोईर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  त्यावेळी तालुका प्रमुख मुकेश पाटील, पिंपळेश्वर मंदिर अध्यक्ष मोहन पाटील, शाखा प्रमुख अनिल म्हात्रे, गितेश म्हात्रे,  उमेश सुर्वे, शंकर म्हात्रे, रमेश म्हात्रे, अशोक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुखदेव पाटील, रघुनाथ पाटील, अरुण पाटील, संदिप पाटील, प्रकाश पाटील, अमोल पाटील, विनायक पाटील, विक्रम म्हात्रे, सुजित कदम, रेखा गायकवाड, गीता कडव यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नागरिक, महिला उपस्थित होत्या. या जलवाहिनीसाठी १५ लक्ष रुपये व यापूर्वी युनियन बँक ते रविकिरण सोसायटी पर्यंत रस्त्याकरिता विशेष निधीतून ५० लक्ष रुपये दिल्या बद्दल रविकिरण सोसायटी, चेरानगर परिसरातील नागरिकांनी माजी आमदार सुभाष भोईर यांचे आभार मानले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत