दिवाकर सिंह समाजवादी पार्टीचे नवीन ठाणे जिल्हाध्यक्ष

 



ठाणे : समाजवादी पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. नवीन संरचनेनुसार दिवाकर सिंह यांची पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी नेमणूक केली आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि महाराष्ट्राचे प्रभारी लकी यादव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्राचे पक्ष प्रमुख अबू आझमी यांनी दिवाकर सिंह यांची नियुक्ती केली आहे.

पक्षाने दिलेल्या नव्या जबाबदारीमुळे समाजवादी विचार जनसामान्यापर्यंत पोहचवण्यास आपले प्राधान्य राहणारअसून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी हेवेदावे सोडून या कामात झोकून द्यावे असे आवाहन दिवाकर सिंह यांनी केले आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून आपण सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी लढणार असल्याचे दिवाकर सिंह यांनी सांगितले. समाजवादी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिवाकर सिंह यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या नेतृत्वखाली पक्षाला ठाणे जिल्हयात बळकटी मिळेल असा आशावाद व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत