दिवा शहराचा कायापालट करणार – माजी आमदार सुभाष भोईर
दिवा – कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचा आमदार असताना सर्वात जास्त आमदार निधी दिवा शहराला दिला होता. मागील पाच वर्षे दिवा शहराचा विकास रखडला परंतु येत्या काळात ठाणे महानगरपालिका व शासनाच्या माध्यमातून दिवा शहरासाठी भरघोस निधी प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घेवून दिवा शहराचा कायापालट करणार असल्याचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले. चंद्रांगण रेसिडेन्सी समोर मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते त्याचा मुख्य रस्त्यावरून ये जा करण्याऱ्या तसेच चंद्रागण सोसायटी व परिसरातील सोसायटी मध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यासाठी व्यापारी तसेच नागरिकांनी माजी आमदार सुभाष भोईर यांच्याकडे आरसीसी गटर करण्याची मागणी केली होती. त्या ठिकाणी आरसीसी गटर बांधण्यासाठी माजी आमदार सुभाष भोईर यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पाठपुरावा करीत असताना त्यांनी त्वरित अहवाल सादर करण्यास सांगितले व विद्यमान आयुक्त सौरभ राव यांनी सदर प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे या परिसरातील आरसीसी गटर काढण्याचा मार्ग मोकळा झाला. या भूमिपूजन प्रसंगी दिवा गावचा भूमिपुत्र म्हणून दिवा शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी कायम अग्रभागी असल्याचे सांगून दिवा शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या भूमिपूजन प्रसंगी दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, शहर संघटिका ज्योती राजकांत पाटील, व्यापारी संघटना अध्यक्ष चेतन भिम पाटील, उद्योजक अनिल भगत, युवा सेना उपजिल्हा अधिकारी स्वप्निल पावशे, युवा सेना शहर अधिकारी अभिषेक ठाकूर, उप विधानसभा अधिकारी जितु पाटील, उप शहर संघटक प्रविण उतेकर, विभाग प्रमुख वैकुंठ म्हात्रे, चेतन पाटील, राजेश भोईर, मच्छिंद्र लाड, हेमंत नाईक, शनिदास पाटील, रवि रसाळ, विश्वनाथ पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक, उपशहर संघटिका स्मिता जाधव, उज्वला पाटील, महिला समन्वयक प्रियांका सावंत, विभाग संघटिका विनया कदम, उप शहर अधिकारी सुयोग राणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Post a Comment