स्वा. सावरकर नगरात `नवरात्र उत्सव स्वच्छतेचा' लोकसहभागातून ‘डीप क्लीन ड्राईव्ह’
ठाणे,: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 'ठाणे बदलतंय' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रतिवर्षी 'स्वच्छता पंधरवडा' १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत हिंदुस्थानात सर्वत्र साजरा केला जातो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या स्वच्छता मोहीम संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा झाला. या निमित्ताने खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्र.14, स्वा. सावरकर नगरामध्ये `नवरात्र उत्सव स्वच्छतेचा' उपक्रमात सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्या सोबत दिलीप बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्र. १४ मध्ये ठाणे महानगर पालिका अंतर्गत स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता मध्ये डीप क्लीन ड्राईव्ह या उपक्रमाचा शुभारंभ ठामपा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या हस्ते झाला. यावेळी ठामपा उपायुक्त गजानन गोदेपुरे, सहआयुक्त भालचंद्र घुगे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सार्वजनिक उत्सव मंडळ, संजय चिचकर अध्यक्ष, दीपक निकम आदी उपस्थित होते
स्थानिक 300 शालेय विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. स्वच्छता जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. उपस्थितांनी यावेळी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली.
अनेक नागरिक, राजकीय प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. महापालिका अधिकारी सफाई कामगारासोबत दिलीप बारटक्के यांनी संवाद साधला.
प्रभाग क्रमांक 14 मध्ये डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेत 100 अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 100 सफाई कामगार क्रांतीवीर शहिद भगतसिंग चौक ते इंदिरानगर नाका, सावरकरनगर पोलीस चौकी, लोकमान्य बस डेपो, क्रांतीकारक शहिद भगतसिंग चौक, गुरुद्वारा परिसर धर्मवीर आनंद दिघे मार्ग जय गणेश हॉस्पिटलच्या बाजूला विद्युत महावितरण कंपनीचा आतील व बाहेरील परिसर आदि ठिकाणी अथकपणे काम करताना दिसत होते.
ठाणे महानगरपालिका पुढील काळात हा स्वच्छतेचा जागर कायम चालू ठेवणार असून रहिवाशांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही महानगरपालिका नेहमीच कार्यरत राहील, यासाठी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन ठामपा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी यावेळी केले. ‘डीप क्लीन ड्राईव्ह’चे सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केले.
Post a Comment