मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस रुग्णालय ठाणेकरांच्या सेवेत दाखल

                                          


बहुप्रतिक्षित सुसज्ज असे १५० रुग्णशय्येचे नळपाडा येथील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते संपन्न झाला.
जलद आणि प्रभावी उपचार तसेच अत्याधुनिक सोयी-सुविधा युक्त असे हे कॅशलेस रुग्णालय आहे. सरकारच्या योजने अंतर्गत विविध उपचार व तपासण्या याठिकाणी रुग्णांना मोफत मिळणार आहेत. प्राथमिक तपासणी व निदान, २ डी इको, यूसीजी, सीटी स्कॅन, एक्स-रे, रक्त तपासणी इ. मोफत तपासणींचा समावेश आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मेंदू, हृदय, मूत्रपिंड, अस्थिरोग, कॅन्सर आदी शस्त्रक्रिया मोफत असणार आहेत.
सर्वसमान्य व गरजू रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी या रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. आजपासून हे रुग्णालय लोकांच्या सेवेत दाखल झाले याचे अत्यंत समाधान आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्याने हे रुग्णालय साकार झाले याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत