ठाण्याचा नेमबाज रुद्रांक्ष पाटील सन 2022-23 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचा मानकरी

 



    ठाणे (जिमाका):- हँगझोऊ येथे सप्टेंबर 2023 मध्ये संपन्न झालेल्या “आशियाई खेळ 2022” मध्ये 10 मीटर एअर रायफल या नेमबाजी प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करून भारतासाठी सूवर्णपदक जिंकणाऱ्या ठाण्याच्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील याला नुकताच महाराष्ट्र शासनाचा “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2022-23 (खेळाडू)” जाहीर झाला आहे.

     रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील हा पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.बाळासाहेब पाटील व ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगिनी पाटील यांचा सुपुत्र आहे. रुद्रांक्षला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत