148-ठाणे विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्याची कार्यवाही पूर्ण

 

मतदारांना यादी पाहण्यासाठी उपलब्ध



    ठाणे (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या छायाचित्रासह मतदारयादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीमध्ये ज्या मतदारांचे दुबार नाव आहे, त्या मतदारांच्या घरोघरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याद्वारे जुलै 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीतील भेटी दिल्या असता एकाच यादी भागात दुबार नाव असल्याचे निदर्शनास आले आहे.

     त्यानुषंगाने सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत मतदारांच्या घरी जाऊन नमुना नं. 7 भरुन घेण्यात आले. नमुना अर्ज 7 च्या हरकती विहित पद्धतीनुसार लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 व मतदार नोंदणी अधिनियमाच्या नियम, 1960 मधील तरतूद व भारत निवडणूक आयोगाच्या दिलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार निवासी पत्त्यावर राहत नसल्याबाबत संबंधित 1 हजार 81 मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

     तरी वगळणी झालेल्या मतदारांची यादी ही मतदार नोंदणी अधिकारी, 148-ठाणे विधानसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, पाचवा मजला, पिन कोड 400601, माजिवाडा प्रभाग समिती कार्यालय, उथळसर प्रभाग समिती कार्यालय, नौपाडा प्रभाग समिती कार्यालय व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे तसेच तलाठी कार्यालय, ठाणे, नौपाडा, पांचपाखाडी, माजिवडे, कोलशेत, चितळसर यांच्या कार्यालयात सर्व नागरिकांना पाहण्यास उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच ही यादी www.thane.nic.in व www.thaneelection.in या संकेतस्थळांवर देखील उपलब्ध आहे.

     या कार्यवाहीबाबत हरकती असल्यास त्या मतदारांनी त्यांच्या हरकती मतदार नोंदणी अधिकारी, 148-ठाणे विधानसभा मतदारसंघ यांच्या कार्यालयात दि.13 ऑक्टोबर 2024 पूर्वी नोंदवाव्यात, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, 148-ठाणे विधानसभा मतदारसंघ उर्मिला पाटील यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत