महावितरणमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा विविध गावांमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा जागर
कल्याण: महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण आणि भांडुप परिमंडल कार्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक सुनिल काकडे यांच्या हस्ते प्रादेशिक विभाग कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले. तर कल्याण परिमंडल कार्यालयात मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा आणि भांडुप परिमंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता सुनिल यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर कल्याण व भांडुप परिमंडल कार्यालयांतर्गत विविध गावांत स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ग्रामसभांमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची व्यापक जनजागृती करण्यात आली.
घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश मुख्य कार्यालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार कल्याण एक व दोन, वसई, पालघर, ठाणे, वाशी, पेण या मंडल कार्यालयांतर्गत विविध गावांमध्ये आयोजित ग्रामसभांमध्ये या योजनेची माहिती देण्यात आली. महावितरणच्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला महाव्यवस्थापक अनिल बराटे, उप महाव्यवस्थापक योगेश खैरनार, अधीक्षक अभियंते निलकमल चौधरी, कैलास दुधबर्वे, दीपक पाटील, दिलीप भोळे, मोहन काळोखे, महेश अंचिनमाने, सहायक महाव्यवस्थापक हविशा जगताप, धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र बागुल, कार्यकारी अभियंते कौमुदी परदेशी, प्रवीणकुमार थोरात, प्रवीण काळे, मिलींद चौधरी यांच्यासह अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment