ठाणे महापालिकेच्यावतीने ७८वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

 



ठाणे : ७८वा भारतीय स्वातंत्र्यदिन ठाणे महानगरपलिकेच्यावतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल,  अग्निशामक दल आणि टीडीआरएफ यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

ध्वजारोहण सोहळ्यास माजी नगरसेवक नारायण पवारमाजी नगरसेवक संदीप लेले,  माजी नगरसेवक विकास रेपाळेअतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरिश झळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी, गुणवंत कामगारांचे कुटुंबिय उपस्थित होते.

त्यानंतर, ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या १० प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्काराने आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्यात, शिल्पा रोहिदास पलांडे, लक्ष्मण महादेव मांढरे, कविता वसंत पाटील, सावित्री अनिल शहा, संदीप रामचंद्र लवांदे, मरूबाई सिद्धार्थ उबाळे, पद्माकर वसंत पाटील, शेखर लक्ष्मण मोरे, संजय मारूती म्हात्रे, उषा ढाकणे या गुणवंत कामगारांचा समावेश आहे. या सत्कारप्रसंगी, उपायुक्त (घनकचरा) तुषार पवार आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे उपस्थित होते.

याप्रसंगी, आयुक्त राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, स्वच्छ, आरोग्यदायी, सुंदर स्वातंत्र्य ठरो, अशी अपेक्षाही व्यक्त केली. ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश आहे, असेही आयुक्त राव यांनी सांगितले.

                ध्वजारोहणानंतर महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमांनातसेच महनीय व्यक्तींच्या शहरात विविध ठिकाणी असलेल्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, मान्यवरांनी तिरंगा स्वाक्षरीही केली. या प्रसंगी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, उपायुक्त (परिमंडळ २) शंकर पाटोळे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरिश झळके उपस्थित होते.

घरोघरी तिरंगा या अभियानाच्या निमित्ताने, ठाणे महापालिकेच्यावतीने ०९ ऑगस्टपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शालेय विद्यार्थ्यांच्या तिरंगा यात्रा, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा स्वाक्षरी आदी उपक्रमांचा समावेश होता. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत