ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स आयोजित 'घरोघरी तिरंगा मॅरेथॉन रॅलीस धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बाईक आणि सायकल रॅलीचेही आयोजन
ठाणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या 'घरोघरी तिरंगा' या अभियानातंर्गत गुरूवार, १५ ऑगस्ट रोजी ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा मॅरेथॉन, बाईक आणि सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. महापालिका मुख्यालय येथून आमदार संजय केळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या सर्व रॅलींना हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (क्रीडा) मीनल पालांडे, उपायुक्त (समाज विकास) अनघा कदम, रिमा देवरुखकर, यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
'घरोघरी तिरंगा' या अभियानातंर्गत आयोजित केलेल्या ५ कि.मी, ३ कि.मीच्या तिरंगा रॅलीत विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिका मुख्यालय येथून सुरू झालेली ५ कि.मी. स्पर्धा नितीन जंक्शन, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, कॅडबरी जंक्शन, सत्कार रेसीडन्सी, वर्तकनगर सिग्नल, एमआरआर हॉस्पिटल येथून पुन्हा त्याचमार्गे महापालिका भवन येथे समाप्त झाली. तर ३ कि.मी स्पर्धा महापालिका मुख्यालय येथून सुरू होवून नितीन जंक्शन, सर्व्हिस रोड, वाहतूक शाखा कार्यालय, विठ्ठल सायन्ना मंदिर, हरि निवास सर्कल, आराधना टॉकीज, अरुणकुमार वैद्य चौक येथून महापालिका भवन येथे समाप्त झाली.
सायकल रॅलीत 'आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशन'चे ०७ वर्षापासून ते ७० वर्षापर्यंतचे सायकलप्रेमी सहभागी झाले होते. तर, बाईक रॅलीतही मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते. सर्व सहभागी सायकलपटू आणि बाईकस्वार यांना सहभागाची पदके देऊन गौरविण्यात आले. राईड फॉर कॉज अॅथलेटिक असोसिएशन, पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या सहकार्याने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.
मॅरेथॉनचा निकाल
मॅरेथॉनमधील विजयी धावपटूंना अनुक्रमे पाच हजार, चार हजार, तीन हजार अशी रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळा उपायुक्त अनघा कदम, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांच्या हस्ते पार पडला.
१५ वर्षावरील मुले (५ कि.मी) स्पर्धा
१. अनिल कोरवी
२. आकाश चौहान
३. अक्षय पडवळ
१५ वर्षावरील मुली (५ कि.मी) स्पर्धा
१. साधना यादव
२. गायत्री शिंदे
३. अदिती पाटील
१५ वर्षाखालील मुले (३ कि.मी) स्पर्धा
१. पृथ्वी राजभर
२. प्रियांशु जैस्वाल
३. विवेक शहा
१५ वर्षाखालील मुली (३ कि.मी) स्पर्धा
१. कृतिका चव्हाण
२. वंदना ठाकूर
३. इच्छा राजपूत

Post a Comment