महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक

ठाणे लोहमार्ग पोलिसांनी महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या युवतीला अटक केल्या असून तिच्याकडून पोलिसांनी १३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. १२ गुन्ह्यातील ८ तोळे दागिन्यांचा ऐवज सुध्दा पोलिसांनी हस्तगत केला आहे. महिला प्रवाशांच्या गळ्यतील दागिने चोरी करण्यासाठी ती रेल्वे स्थानकातील महिलांच्या मध्य भागातील डब्याची निवड करायची. चोरी करण्याच्या तिच्या याच पद्धतीने ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली. अनेक दिवसांपासून ठाणे रेल्वे स्थानकात महिला प्रवशांच्या डब्या जवळ महिलांचे मंगळसूत्र, सोनसाखळी चोरी होत असल्याच्या घटना वाढल्या होत्या. ठाणे लोह मार्ग पोलिसांसाठी या घटना डोकेदुखी ठरल्या होत्या. महिलांच्या सकाळी वाढू लागल्याने वरिष्ठांनी या प्रकरणात लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांना या प्रकरणांचा छडा लावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार दुसाने यांनी विशेष पथक तयार करून या गुन्ह्यांवर नगर ठेवण्याच्या आदेश दिले. त्यानुसार पथकांनी ठाणे स्थानकावर साध्या वेषातील पोलिसांमार्फत नजर ठेवली. फलाटावरील सीसीटीव्ही तपासले. मात्र आरोपीचा ठाव ठिकाणाला लागत नव्हता. २० दिवसांपासून हे पथक आरोपीला पकडण्यासाठी पाळत ठेवून होते. अर्चना दुसाने यांनी चोरीच्या प्रकाराचा आणि घटना स्थळाचा अभ्यास केला असता हे प्रकार गर्दीच्या वेळी आणि महिलांच्या राखी डब्यामध्ये चढताना किंवा उतरताना होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पथकाला तसे निर्देश दिले असता या पथकाला एका२६ वर्षीय तरुणीवर संशय आला असता त्यांनी तिला (ता.२५ जुलै) ताब्यात घेतले. तिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या समोर उभे केले असता तिने चोरी केलेल्या सर्व घटना सांगितल्या. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिच्याकडून ७७.२४० मिली ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या दागिन्यांचे बाजारभावानुसार एकूण किंमत ५,०४,३०० एवढी आहे. या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश नावकार, पोलिस उप निरीक्षक संजय मडव, पोलिस हवालदार दत्तात्रय राठोड, महिला पोलिस हवालदार साक्षी सावंत, पोलीस शिपाई मीरजावेद नदाफ, राकेश गोसावी, हर्षद गायकवाड, नितीन सरवदे, अक्षय रणसिंग, अमोल मोरे यांनी भाग घेतला. आरोपी कडून सर्व गुन्ह्यांची उकल झाली असून एका प्रकरणाव्यतिरिक्त सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हा करण्यासाठी ही महिला लोकलचा महिला राखीव मधला डबा निवडत असल्याचे आमच्या लक्षात आल्याने त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवले. अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणे लोहमार्ग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत