ठाणे कॉंग्रेसकडून अनुराग ठाकूर यांच्या विरोधात निषेध आंदोलन

 


ठाणे (प्रतिनिधी) समाजातील सर्व घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जात निहाय जनगणना करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीतील मित्र पक्ष जातनिहाय जनगणना करण्यास कट्टीबद्ध आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे.

        विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जात निहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेतच्या विचारधारेतून आलेल्या भाजपाच्या अनुराग ठाकूरांनी “ज्यांच्या जातीचा पत्ता नाही, ते जात निहाय जनगणेची मागणी करत आहेत असे वक्तव्य करून या देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान केला याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून बहुजनांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा तसेच जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या अनुराग ठाकूर याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी प्रदेश प्रतिनिधी जे बी यादव, सुखदेव घोलप भालचंद्र महाडिक,निशिकांत कोळी, रमेश इंदीसे, शितल अहेर,महिला अध्यक्ष स्मिता वैती,ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे,सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, मागासवर्गीय अध्यक्ष उमेश कांबळे, किसान सेल अध्यक्ष ऋषिकेश तायडे, पर्यावरण अध्यक्ष मनोज डाकवे,सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्निल कोळी, ब्लॉक अध्यक्ष अंजनी सिंग,हिंदुराव गळवे,राजू शेट्टी,जावेद शेख,सुरेश भोईर ,आनंद सांगळे,जेष्ठ नेते महिंद्र म्हात्रे, सुरेश पाटील खेडे, शिरीष घरत,दयानंद एगडे, गोपाळ सावंत,प्रसाद पाटील,बाबू यादव,सुभाष ठोंबरे, मुन्ना राजोरिया, अमरनाथ गुप्ता,संजय घाग,संगीता कोटल, शेणू नायर प्रतिभा मेनन, अपर्णा सावंत, किशोर कांबळे, किरायात मुकादम, राज चव्हाण, सुमन वाघ, आशा म्हस्के ,रवी डोळस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत