मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला





ठाणे येथील आनंदआश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी हजारो महिलांनी येऊन त्यांना राखी बांधून हा सण साजरा केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात रक्षबंधनापूर्वी जमा होतील असे आपण सांगितले होते. त्यानुसार राज्यातील 1 कोटी 4 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3 हजार रुपये जमा झाल्यामुळे यंदा हा सण जास्तीच उत्साहात आणि आनंदात साजरा केला गेला. 

यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षी शिंदे, विधानसभा प्रमुख हेमंत पवार, शिवसेनेचे टेंभी नाका व ठाणे शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत