माजी आमदार सुभाष भोईर यांच्यावतीने कल्याण ग्रामीण मतदार संघात वह्यांचे मोफत वाटप

 


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्यामार्फत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पिंपरी, ठाकूरपाडा, दिवा, शिळ, डोंबिवली या विभागातील इयत्ता ५ वी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थांना सुमारे १० हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याची सुरुवात दिवा विभागातून करण्यात आली. त्यावेळी शहरप्रमुख सचिन पाटील, शहर अधिकारी अभिषेक ठाकूर, उपशहर संघटक प्रविण उतेकर, विधानसभा संघटिका योगिता नाईक, शहर संघटिका ज्योती राजकांत पाटील, शहर समन्वयक प्रियांका सावंत, उपशहर संघटिका स्मिता जाधव, विभागप्रमुख राजेश भोईर, चेतन पाटील, मच्छिंद्रनाथ लाड, नागेश पवार, हेमंत नाईक, युवासेना उपशहर अधिकारी उमेश शिंदे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार सुभाष भोईर यांनी विद्यार्थांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत