कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत काही शिक्षकांनी पैसे घेतल्याचे समजते
ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप
चौकशीची केली मागणी
ठाणे, - सीईटी आणि नीट परिक्षांचे फुटलेले पेपर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी काही शिक्षकांनी पैसे घेतल्याचे समजते. दोन्ही घटनांमध्ये शिक्षकी पेशा बदनाम झाला असून याप्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आज एक पत्रकार परिषदेत ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी केली.
सर्व मेडिकल फील्डच्या ऍडमिशन करता 24 लाख विद्यार्थी बसले होते. या परीक्षेमध्ये अतिशय गोंधळाचे वातावरण तयार झाल्याने पेपर फुटल्याचे उघड झाले. बिहार आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी पेपर फुटलेला आहे आणि त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याबद्दल विक्रांत चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली.
मागील सात वर्षांमध्ये जवळपास 70 पेपर फुटलेले आहेत. यातील अतिशय अनेक महत्त्वाच्या परीक्षा आहेत. देशातील अनेक केंद्रातील शिक्षक किंवा मुख्याध्यापक किंवा कर्मचारी यांचा या परीक्षा प्रक्रियेशी थेट संबंध येतो. पेपर फूटीमध्ये जसा काही शिक्षकांचा थेट संबंध आला तसा कोकण पदवीधर मतदारसंघात पैशांचा पाऊस पडला. काही शिक्षक आणि संस्था चालकांनी यात आपले हाथ ओले करुन घेतले असल्याचे समजते. पेपर फूटी आणि पदवीधर निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.

Post a Comment