केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीवर खासदार प्रतापराव जाधव यांची नियुक्ती
शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन
नवी दिल्ली, ता. ४ जुलै २०२४
केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने विविध विषयांवरील मंत्रिमंडळाच्या विशेष समितींच्या आज घोषणा केली. गुंतवणूक आणि विकास या विषयावरील मंत्रिमंडळाच्या समितीवर शिवसेना खासदार केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) श्री. प्रतापराव जाधव यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या घोषणेनंतर शिवसेना पक्षाचे लोकसभेतील गटनेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार प्रतापराव जाधव यांचे अभिनंदन केले.
बुलढाण्यातून सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंड़ळात आयुष मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे केंद्र सरकारमधील एकमेव मंत्री आहेत. खासदार श्री. प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्य मंत्रिपद (स्वतंत्र कारभार) देण्यात आला आहे.
आता केंद्रीय नेतृत्वाने खासदार श्री. प्रतापराव जाधव यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विशेष समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुंतवणूक आणि विकास या विषय समितीवर पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंग, गृहमंत्री श्री. अमित शहा, भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी, अर्थमंत्री श्रीमती. निर्मला सितारामन, वाणिज्य मंत्री पियूष गोयल, ग्राहक संरक्षण मंत्री श्री. प्रल्हाद जोशी, वस्त्रोद्योग मंत्री श्री. गिरीराज सिंग, रेल्वे मंत्री श्री. अश्विन वैष्णव, दळणवळण मंत्री श्री.ज्योतिरादित्य शिंदे, पेट्रोलियम मंत्री श्री. हरदिप सिंग पुरी आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्री. चिराग पासवान यांचा समावेश आहे. या समितीवर श्री. प्रतापराव जाधव आणि श्री. इंद्रजीत सिंग यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना हा एनडीएमधील सर्वात जुना आणि विश्वासू मित्रपक्ष आहे. नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातून ७ खासदार निवडून आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहेत.

Post a Comment