महाराष्ट्र राज्य उत्पाद शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांकडून नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री मा. ना. प्रतापराव जाधव यांचा सत्कार




मुंबई, -शिवसेनेचे नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री मा. ना. प्रतापराव जाधव यांनी आज मुंबई येथे उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांची त्यांच्या पावनगड निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. 


रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न झाला. मा. ना. प्रतापराव जाधव यांनी आयुष मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज मुंबई दौऱ्यावर असताना मा. ना. प्रतापराव जाधव यांनी आज मा. ना. शंभूराज देसाई साहेबांची सदिच्छा भेट घेतली.


यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी मा. ना. प्रतापराव जाधव यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. 


यावेळी त्यांच्यात मनमोकळा संवाद झाला. मा. ना. प्रतापराव जाधव यांच्या रूपाने एक सच्चा शिवसैनिक केंद्रीय राज्यमंत्री झाला आहे, याचा आनंद असून मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते निश्चितच केंद्रीय मंत्रिमंडळात आदर्शवत काम करतील, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी व्यक्त केला.


यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. तानाजी सावंत, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत