जागतिक पर्यावरण दिननिमित्त नमुंमपा आरोग्य विभागामार्फत रूग्णालय परिसरात वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार वृक्षारोपण, सार्वजनिक स्वच्छता अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य विभागानेही सहभागी होत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांचा परिसर वृक्षसंपदेने हरीत असावा यादृष्टीने वाशी, नेरूळ व ऐरोली येथील सार्वजनिक रूग्णालये तसेच बेलापूर व तुर्भे येथील माता बाल रूग्णालये यांच्या परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची शपथ घेतली.
त्या सोबतच रूग्णालयांमध्ये आंब्याच्या कोयी (Mango Seeds) संकलनाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये संकलित केलेल्या आंब्याच्या कोयी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, सार्वजनिक रूग्णालय वाशीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेश म्हात्रे, सार्वजनिक रूग्णालय नेरूळचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.उद्धव खिल्लारे व सार्वजनिक रूग्णालय ऐरोलीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रविंद्र म्हात्रे तसेच बेलापूर माता बाल रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा राठोड व तुर्भे माता बाल रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पाटील यांच्यासह उपस्थितांच्या हस्ते मोठ्या संख्येने देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.
Post a Comment