संस्कारभारती कोकण प्रांत आणि लोकायन सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि बहुउद्देशीय संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, कोकणातील प्रयोगात्म लोककलांचा परिसंवाद दि. ८ आणि ९ जून सायं ठीक ७ ते ९ या कालावधीत झूमच्या माध्यमाने ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात भरतमुनी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लोककलाकार श्री. गणपत सखाराम मसगे हे ठाकर लोककला प्रकारात कळसुत्री बाहुल्या, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, कळ बाहुली, पोवाडा, फुगडी, डोनागीत, पांगुळ बैल, गोंधळ, पोत, राधा नृत्य, पिंगळी या बारा लोककला प्रकारांवर प्रकाश टाकणार आहेत तर श्री. शंकर मेस्त्री दशावतार नाट्यप्रकार आणि प्रा. डॉ. सूर्यकांत आजगावकर हे नमन खेळे या प्रकारावर मार्गदर्शन करतील. या परिसंवादाच्या सूत्रधार लोककला लोकसाहित्य अभ्यासक डॉ. मोनिका ठक्कर या आहेत. हा परिसंवाद सर्वांसाठी विनामूल्य असून, नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी ८८५०३८५१२९ या क्रमांकावर संपर्क करावा.लोकायन बहुउद्देशीय संस्था गेली अनेक वर्षे लोककलेच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. या संसंस्थेच्या माध्यमातून वगनाट्य - लोकनाट्य - आख्यान लेखन कार्यशाळा, भारूड कार्यशाळा,अंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संशोधन परिषद, लोककला आणि लोकसाहित्य विषयक व्याख्यान असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या संस्थेचा मुख्य उद्देश प्रयोगात्म लोककलांना प्रोत्साहन देऊन नवीन पिढीला रंगमंच मिळवून देणे आणि विद्यार्थी तसेच प्रतिभावंतांना लोककला आणि लोकसाहित्याच्या क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. इंस्टाग्राम रील स्पर्धेच्या माध्यामातून लोककलेकडे नवीन पिढीला आकर्षित करण्याचे कार्य हि लोकायन संस्था करते आहे.
Post a Comment