अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त ठाण्यात रंगला "धनगर रत्न" पुरस्कार सोहळा

 


 
ठाणे  : धनगर प्रतिष्ठान,ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, ठाणे  यांच्या वतीने रविवारी "धनगर रत्न" पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षीचे धनगर रत्न पुरस्कार  तेजस्विनी गलांडे ( शासकीय ),गणेश कुरकुंडे ( पत्रकारिता),अनिकेत पडसे ( सामाजिक),अनिल झोरे ( शैक्षणिक ),अक्षय मासाळ ( क्रीडा ),डॉ स्मिता काळे-बंडगर ( वैद्यकीय ), भीमराव जानकर ( उद्योजक ),नागू आप्पा वीरकर  ( लेखक - साहित्यिक ),आकांक्षा शंकर वीरकर ( राजकीय ),सचिन तामखडे (कला ) राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान,नवी मुंबई  (सामाजिक संस्था)  यांना प्रदान करण्यात आले.तर पुश अप्स मध्ये ग्रिनीज वल्ड रेकॉर्ड करणारे संजय देवकाते यांचा विशेष सन्मान करण्यात आला.ठाण्यातील पाचपाखाडी येथील  ठाणे महापालिकेच्या कै नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर,वसई विरार महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे,माजी नगरसेविका विशाखा खताळ,समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे,बाबासाहेब दगडे,संजय वाघमोडे,यशवंत सेना नवी मुंबई अध्यक्ष अभिजित कोकरे,समाजसेवक संदेश कवितके,संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला अध्यक्षा माधवी गणेश बारगीर आदीसह मान्यवर उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य इतके मोठे आहे कि सर्व समाजाने त्यांची पूजा केली पाहिजे अशा शब्दात आमदार संजय केळकर यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. समाजातील रत्न शोधून त्यांना पुरस्कराच्या माध्यमातून बळ देण्याचे काम धनगर प्रतिष्ठान करत आहे त्यामुळे प्रतिष्ठानचे कौतुक करावे तितके कमी आहे अशा शब्दात केळकर यांनी प्रतिष्ठानचे कौतुक केले.धनगर प्रतिष्ठान सतत समाजाच्या समस्या,प्रश्न सोडवण्यात पुढे असतात.त्यामुळे प्रतिष्ठान करत असलेल्या या सामाजिक कार्याला आमचे कायमचे पाठबळ असले असे सांगून मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे सुशोभीकरणासाठी आमदार निधी लागला तर देऊ असे आश्वासन देखील केळकर यांनी दिले आहे.सरकारने समाजासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत या योजना समाजापर्यंत पोहचवण्यासाठी आपण पुढाकार घेऊन विविध शिबिरे आयोजित करण्यात येईल असे केळकर यांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील फोनवरून या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन धनगर प्रतिष्ठानच्या वतीने माझाकडे केलेल्या मागणीनुसार अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी भरीव निधी देऊन भव्य स्मारक उभारू असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.  

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव तुषार धायगुडे ,खजिनदार अनिल जरग,उपाध्यक्ष कुमार पळसे,राजेश वीरकर,प्रचारप्रमुख सचिन बुधे,उपखजिनदार सुरेश भांड,सल्लागार दिलीप कवितके, सूर्यकांत रायकर,मनोहर वीरकर,प्रसाद वारे,गणेश बारगीर,अविनाश लबडे,राजेश वारे,दीपक झाडे,संतोष बुधे,संतोष दगडे,उत्तम यमगर,अंकुश उघाडे,उद्धव गावडे,महेश पळसे,अनिकेत पडसे,महिला मंडळाच्या उपाध्यक्ष संगीता खटावकर,सचिव गायत्री गुंड,सचिव गायत्री गुंड,खजिनदार भारती पिसे,उपसचिव सुजाता भांड,उपखजिनदार सुषमा बुधे,सल्लगार अर्चना वारे,मीना कवितके,शीतल डफळ,वंदना वारे,अमृता बुधे,सीमा कुरकुंडे,मनीषा शेळके,रंजना यमगर,स्मिता गावडे,शुभांगी उघाडे,रिचा कुलाळ आदींसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत