मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत नरेश म्हस्के यांचे नवी मुंबई येथे जोरदार शक्तीप्रदर्शन
नवी मुंबई, - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हा माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार डॉ. संजिव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांच्यासह प्रमुख उपस्थितीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज गुरुवार, दि. ९ मे रोजी महायुतीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ नवी मुंबई येथे प्रचार फेरी काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
नवी मुंबई येथील विविध प्रभागांत नरेश म्हस्के यांचा विकासरथ फिरला. ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पाच तास ही प्रचार फेरी संपूर्ण परिसरात फिरली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणे लोकसभा मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. जिथे जिथे आम्ही गेलो तिथे आमचे उत्स्फुर्त स्वागत झाले. प्रचंड प्रतिसाद महायुतीला मतदारांकडून मिळत आहे. नवी मुंबई येथे मोठ्या प्रमाणात राज्य शासनाच्या वतीने विकासकामे सुरु आहेत. राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात गेल्या १० वर्षात केलेल्या कामाची पोचपावती मतदार आम्हाला देतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

माझ्या निवडणुकीची आजची ही प्रचार फेरी नसून विजय रॅली आहे. जनतेचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायला नवी मुंबई सज्ज असल्याची प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली आहे.
प्रचार फेरी दरम्यान नरेश म्हस्के यांनी एपीएमसी मार्केट, धर्मवीर संभाजी राजे भाजीपाला बाजार संकुल, सेक्टर २० येथील दत्त मंदिर भाजीपाला मार्केट, नवी मुंबई कांदा-बटाटा मार्केट यांना भेट देऊन तेथील व्यापारी, कामगार यांच्याशी चर्चा केली. तसेच नवी मुंबई येथील माजी नगरसेवकांची प्रत्यक्ष भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.

Post a Comment