चंदनवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

 


ठाणे,  ः दहावीचा निकाल लागल्यानंतर चंदनवाडी विभागातील रहिवाशी विद्यार्थी यांनी दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले बद्दल डॉ. जितेंद्र आव्हाड व मा. खा. राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली राजु चापले, रुपाली राजु चापले व अशोक चापले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र विध्यालय शालेय व चंदनवाडी विभागात प्रथम गुण मिळवले कु. रितीका राजु जांभुळकर (94.20%), कु. रुषिकेश शिवाजी शेडगे (93.40), कु. श्लोका निलेश डफळ (90.80),  कु. मानस अनिल मांढरे (84.80), कु. मुग्धा संतोष घोणे,  कु. मंथन सुनिल गायकर, कु. हर्षल राम गाडे यांचा सत्कार समारंभ करुन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित  मा. ठामपा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई, विक्रम खामकर, प्रदिप शिंदे, दत्ता सावंत, जिवाजी कदम,  एकनाथ आहिरे, श्री. सचिन पंधेरे, धोंडुराम मोरे, अजय जाधव, रत्नेश दुबे, मानसी पालवे व उत्तम पोंगडे यांनी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रकांत चव्हाण यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत