सेल्फी पॉईंट झाले भकास ,ठाणेकरांच्या पैशांचा चुराडा
ठाणेकरांमध्ये संतापाचे वातावरण
ठाणे शहर, (बातमीदार)
प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डात लाखो रुपयांची निधी खर्च करून सेल्फी पॉईंट बांधले आहेत. मात्र हे सेल्फी पॉईंट आता बेवारस झाले आहेत. लाखो रुपयांचा चुराडा करून बांधण्यात आलेले हे सेल्फी पॉईंट तुटलेल्या अवस्थेत उभे आहेत. त्यामुळे तेथे सेल्फी काढणे तर सोडाच परंतु या ठिकाणी उभे राहणे देखील ठाणेकरांना शरमेची बाब वाटू लागली आहे.
ठाणेकरांच्या नागरी सुविधांची जबाबदारी ज्या नगरसेवकांवर सोपवण्यात आली होती त्या नगरसेवकांचा कार्यकाल संपून दोन वर्ष होत आले आहेत. परंतु त्यांच्या कार्यकाळात या नगरसेवकांनी लाखो रुपयांचा खर्च करून आपापल्या वार्डामध्ये त्या त्या परिसराच्या नावाने एक डिजिटल सेल्फी पॉईंट तयार केला होता. या शर्ट पॅन्ट वर आय लव माय... असे शब्द लिहून त्या भागाबद्दल प्रत्येकाला आपुलकी आहे; असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. आकर्षक पद्धतीने हे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेले होते. सुमारे तीन वर्षांपर्वी
उभे केलेले हे संतुलन सर्व ठाणेकरांचे आकर्षण ठरले होते. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना त्याच्या माध्यमातून ठाण्याबद्दल आकर्षण निर्माण होत होते. परंतु हे सेल्फी पॉईंट तयार करून त्यानंतर त्याकडे नगरसेवकांसह ठाणे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ठाणेकरांनी सुध्दा या पॉईंटच्या दुरावस्थेबाबत चिंता व्यक्त केली असून नगरसेवक आणि प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे. नगरसेवकाच्या निधीमधून एका सेल्फी पॉईंटसाठी सुमारे चार ते पाच लाख रुपयांचा खर्च आल्याचे बोलले जात आहे. शर्ट पॅन्ट साठी महापालिकेच्या माध्यमातून विजेची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे हे सेल्फी पॉईंट सध्या तुटलेल्या अवस्थेत असतानाही अनेक ठिकाणी विजेचे दिवे सुरू असतात. अनेक ठिकाणी ते बंद पडलेले आहेत. मात्र दिवे आणि तारा उघड्या असल्याने या ठिकाणी नागरिकांना विजेचा धक्का लागण्याचा देखील धोका निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी या सेल्फी पॉईंट समोर गाड्या पार्क केल्या जात आहेत.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत अनेक ठिकाणी असे सेल्फी पॉईंट बसवलेले पाहायला मिळतात. मात्र अनेक ठिकाणी त्यांची दुरावस्था झालेली आहे. रिक्षा मधून प्रवाशांची वाहतूक करीत असताना दुरावस्था झालेल्या सेल्फी पॉइंट दिसतात. हे दृश्य पाहून वाईट वाटते.
सागर येडे, वर्तकनगर, रिक्षा चालक.
ठाणे शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी हे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. परंतु त्यांची झालेली दुरवस्था पाहून वाईट वाटते. जनतेच्या खिशातून हा पैसा खर्च झाला आहे. त्या ऐवजी आवश्यक नागरी सुविधा देणे जास्त गरजचे होते.
- सचिन शिंदे, काँग्रेस सेक्रेटरी, ठाणे
-
Post a Comment