पोलीस बजावताहेत श्रावण बाळाचे कर्तव्य , कोपरी पोलीस बनले १३ जेष्ठ निराधार कुटुंबांचे पालक
ठाणे शहर, (राजीव डाके)
आजकाल वृद्धांकडे समस्या म्हणून पाहिले जाते. त्यात ते निराधार असतील तर ही समस्या आणखी गहण होते. त्यांना कोणी आधार देणारा, काळजी घेणारा नसतो. शेजाऱ्यांचीही रोज मरे त्याला कोण रडे, अशी अवस्था होऊन बसते. पण कोपरी पोलीस मात्र याला अपवाद ठरत आहेत. निराधार वृद्धांसाठी ते श्रावण बाळाची भूमिका बजावत आहेत. या वृध्दांना काही मदत लागली तर तत्काळ ती त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच कोपरी पोलिसांच्या या आगळ्यावेगळ्या निराधार वृद्ध सेवेची चर्चा सर्वत्र पसरली आहे.
दिवंगत आर आर पाटील हे राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यावर त्यांच्या हद्दीतील निराधार वृद्धांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासून प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलीस त्यांच्या हद्दीतील निराधार वृद्धांची काळजी घेत आहेत. कोपरी पोलिसांकडून देखील ही जबाबदारी आद्य कर्तव्य समजून पार पाडली जात आहे. ज्या वृध्दांना कोणीही नातेवाईक, मुलं नाहीत, अशा वृध्दांना कोपरी पोलीस आधार देण्याचे काम करत आहेत. प्रतेक महिन्यात त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करत आहेत; त्यांना धीर देत आहेत; आपुलकीने त्यांची विचारपूस करत आहेत; काही हवे असेल तर ते आणून देण्याचा प्रयत्न करत आहेत. कायद्याला न जुमानणाऱ्यांना खाकीचा हिसका दाखवणाऱ्या पोलिसांच्या हृदयात निराधारांसाठी मायेचा कप्पा असणे ही नक्कीच भूषणावह बाब आहे. हे कर्तव्य बजावत असताना त्यांना त्या निराधारांमध्ये नक्कीच त्यांचे आईवडील दिसत असणार; म्हणूनच ते त्यांची मनोभावे सेवा करत आहेत.
कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे निराधार वृद्धांचे १३ कुटुंब आहेत. त्यामध्ये काही पती पत्नी तर काही एकटे राहतात. पोलीस या सगळ्यांच्या घरी महिन्यातून एक दोन वेळा जाऊन येतात. त्या सगळ्यांची विचारपूस करतात. त्यांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी ऐकून त्यांचे निराकरण करतात. सण उत्सवाच्या काळात घरी जाऊन आमच्या आनंदात सहभागी होतात.
- कोरोनाच्या काळात पोलिसांनी या वृद्धांची विशेष काळजी घेतली होती. त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंपासून त्यांची औषधे देखील पुरवली होती. या काळात पोलिसांनी त्यांना मोठा आधार दिला होता.
- आम्ही त्यांची आई वडिलांसाठी विचारपूस करतो. त्यांना काही लागल्यास ते आम्हाला फोन करतात. त्यांना नेहमी भेटत असल्याने ते जणू आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य झाले आहेत असे वाटते.
सीताराम गावित, असिस्टंट सब इन्स्पेक्टर
- परिसरात एकटे अथवा दोघे ज्येष्ठ नागरिक रहात असतील तर त्यांची संपूर्ण व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे ठेवतो. अचानक कसली मदत लागली तर तत्काळ पोलीस त्यांच्याकडे धावून जातात. ते सुरक्षित आहेत किंवा नाही, त्यांना काही भीती आहे का, ही माहिती जाणून घेवून त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या घरात कामासाठी कोण येतात, त्यांची वर्तणूक कशी आहे. याबाबत माहिती घेतली जाते. एक डायरी पोलीस ठाण्यात आणि एक डायरी त्या जेष्ठ निराधारांच्या घरात ठेवलेली असते. त्यात पोलीस जाता येता नोंदी करून ठेवतात. यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे साहेबांचे आम्हाला सक्त निर्देश आहेत.
- रणजित डेरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरी पोलीस ठाणे
- गेली ५१ वर्षे आम्ही कोपरीत राहतो. आम्हाला जवळचे नातेवाईक नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आमच्या घरी येऊन विचारपूस करत असतात. आमच्याकडे एक डायरी ठेवली असून, महिन्यातून एक दोन वेळा पोलीस येतात. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे साहेब स्वतः आले होते. ते आल्यामुळे खूप समाधान वाटले. आमची काळजी घेणारे कोणी नातेवाईक नसले तरी आमच्यासाठी पोलीसच आमचे नातेवाईक आहेत. ते आईवडीलांप्रमाने आमची काळजी घेत
-

Post a Comment