मराठा मंडळ , ठाणे -आयोजित शिवजयंती शके १९४५ उत्साहात साजरी.

 



      मराठा मं4डळ, ठाणे या गेली ६२ वर्षे ठाणे परिसरात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीड़ा तसेच समाजाच्या आर्थिक सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या जुन्या जाणत्या संस्थेच्या वतीने  १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

या दिवशी सकाळी ८.३० वाजता मराठा समाजाच्या  तर्फे मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्यां पुतळ्यास मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेशराव सुर्वे यांनी मंडळाच्या सर्व पदाधिका-यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण केला. त्या ठिकाणी शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीमधे मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सामील झाले होते.


त्यानंतर सायंकाळी ५.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्र या मंडळाच्या वास्तुमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. प्रथम मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते देवी तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.


सुरूवातीला शिवकन्या कु. कृष्णाई फोंडके या सात वर्षाच्या चिमुकलीने शिवरायांचा पोवाडा सादर केला. त्यानंतर रिदम आणि रागा या संगीत अकादमीच्या कलाकारांनी हे  हिन्दू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, तुळजाभवानीचा गोंधळ  तसेच शासनाचे महाराष्ट्र गीत सादर करून छत्रपती शिवाजी महाराज यांना संगीतातून मानवंदना दिली.


त्यानंतर मुख्य कार्यक्रमात सुरुवातीस मंडळाचे सरचिटणीस श्री राजेन्द्र साळवी यानी प्रास्ताविकात मंडळाच्या वाटचालीची माहिती दिली. त्यानंतर ते म्हणाले की, " या भारत देशावर यवनी परकीयानी ३०० वर्षे आणि इंग्रजांनी १२५ वर्षे केले याची अनेक कारणे असतील मात्र सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण हे आहे ,ते म्हणजे आपल्यात असलेला ऐक्याचा अभाव ! 

मात्र अठरापगड़ जातीना एकत्र आणून  आपण सर्वांचा पराभव करून हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले आहे.आपण सर्वानी हा आदर्श जपला पाहिजे , जोपासला पाहिजे."


 यानंतर प्रमुख पाहुणे श्री. शंकरराव पालदेसाई - उपाध्यक्ष , मराठा मंदिर, मुबंई व प्रमुख वक्ते श्री. महेंद्र सावंत - शिक्षण विभाग, मुंबई महानगरपालिका यांचे स्वागत आले. श्री. पालदेसाई यांनी " आजच्या कार्पोरेट च्या स्पर्धेत टिकून राहायच असेल तर छत्रपतींसारखे मॅनेजमेंट असणे आवश्यक आहे" असे प्रतिपादन केले


 प्रमुख वक्ते श्री. महेंद्र सावंत यांनी महाराजांची कार्यकुशलता व खंदे सेवक निवड पध्दती, आरमार, किल्ले बांधणी इत्यादी ब-याच  विषयां बाबत महाराजांच्या धोरणीपणावर प्रकाश टाकला 


 यावेळी प्रा. नामदेवराव जाधव " जागतिक किर्तीचे लेखक व वक्ते " यांना मराठा समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी ते सत्काराला उत्तर देताना उत्तर देताना म्हणाले

"शिवाजी या नावाचा अर्थ-

शि  म्हणजे शिका

वा म्हणजे वाचा

जी म्हणजे जिदन्यासा

आजच्या काळात शिवाजी महाराज घडवायचे असतील तर प्रथम जिजाऊ सारख्या माता तयार होणे आवश्यक आहे.मुलांना मोबाईल देण्यापेक्षा शिवचरीत्र द्या किंवा ऐकवा. प्रत्येक आईमध्ये जिजाऊ लपलेली आहे,तिचा आविष्कार होणे गरजेचे आहे.आजच्या युगात दुसऱ्याच्या घरात शिवबा नव्हे तर प्रत्येक घरात शिवबा घडणे आवश्यक आहे "असे स्पष्ट मत त्यानी  मांडले. 

तद्नंतर रिदमिक जिमनॅस्टिक राष्ट्रीय पदक विजेती अवघ्या सतरा वर्षाची कु. अस्मी बडदे व आर्टीस्टीक जिमनॅस्टिक राष्ट्रीय पदक विजेती बारा वर्षाची कु. साक्षी दळवी यांना मराठा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच

अमेरिकेतील भारतीय नागरिकांसाठी हर प्रकारच्या अडचणी वर मार्गदर्शन करणारी ९११ ही हेल्पलाइन सुरु करून सामाजिक कार्य करणाऱ्या डेट्रॉईट, अमेरिका येथे राहणाऱ्या मराठी उद्योजिका  सौ हेमा राचमाले  यांचा आणि श्री सुष्मीत तावड़े यांचा महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध उद्योजकता योजना "उद्यो-मी"  वेब साइट वर एकत्र आणल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमामध्ये "शिवजयंती विशेषांकचे  प्रकाशन प्रमुख पाहुणे श्री. पालदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.  मंडळाचे अध्यक्ष सुर्वे यांनी मंडळातर्फे शिवप्रभुंना अभिवादन केले. सर्वात शेवटी आभार प्रदर्शन करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सफाईदार सूत्र संचालन मंडळाच्या महिलाप्रमुख सौ अपर्णा साळवी यानी केले.

या कार्यक्रमाला ठाणे , मुम्बई परिसरातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थान्चे  प्रतिनिधी उपस्थित होते. यात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष गावड़े, सकल मराठा समाजचे दत्ता चव्हाण , शिरकाई देवी समाजचे सुनील राजेशिर्के , वृद्ध सेवा संघचे महेश भांडारे, ठाणे पत्रकार संघाचे पत्रकार दिलीप शिंदे, दै जनमुद्रा चे दीपक, दळवी ख्वाजा गरीब नवाज संस्थाचे अमजद शेख ,राबोडी, वंजारी समाजाचे श्रीकांत संखे, जेष्ठ नागरिक संघाचे श्री  साने ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रविन्द्र परांजपे ,चैतन्य चैरिटबल ट्रस्टचे ऎड. रूपेश पवार, स्व. आनंद दिघे यांचे खंदे कार्यकर्ते नंदू पोवळl, दै पुढारी,पालघर आवृत्तीचे पत्रकार मंगेश तावड़े, आरे डेयरीचे निवृत्त कार्यकारी संचालक लिम्बाजीराव भोसले,देशमुख मराठा समाजचे  सुधाकर पतंगराव, भंडारी समाज, शिवकृपा पतपेढ़ी,  माजी नगरसेवक विकास रेपाले, नम्रता भोसले,अशा मान्यवारांचा  समावेश होता.कार्यक्रमाला शिवप्रेमींचा  उदंड प्रतिसाद लाभला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत