रंबलिंग पद्धतीचे गतिरोधक बसविण्याची काँग्रेसची मागणी
ठाणे (प्रतिनिधी): तीन हात नाका उड्डाण पुलाच्या खालील सिग्नल वरून मुंबई कडे मार्गक्रमण करणाऱ्या वेगवान वाहनांचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी रंबलिंग पद्धतीचे गतिरोधक बसविण्यात यावेत,अशी मागणी ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केली आहे.
पूर्व द्रुतगती मार्गावर वाहने भरदाव वेगाने मार्गक्रमण करतात, त्यातच तीन हात नाका पुलाच्या खालील सिग्नल वरून सुटलेली वाहने द्रुतगती मार्गावर येण्यासाठी वेगाने येत असतात. तीन हात नाका उड्डाणपूलाखालील रस्त्याने वेगात येणारी वाहने व पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबईकडे मार्गक्रमण करणारी वाहने रस्ते एकत्र मिळत असलेल्या ठिकाणी लहान-मोठे अपघातात वारंवार होत आहेत.
त्यामुळे अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन हात नाका उड्डाण पुलाखालील सिग्नल वरून वेगाने येत महामार्ग मार्गे मुंबई ला जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी करण्यासाठी या रस्त्यावर तत्काळ गतिरोधक किंवा रंबलिंग पद्धतीचे गतिरोधक व धोक्याचा इशारा देणारे फलक उभारणे गरजेचे असल्याने वाहतूक विभागाच्या माध्यमातून सदर ठिकाणी पाहणी करून योग्य त्या उपाय योजना तातडीने कराव्यात अशी मागणी ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त विनय राठोड यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.

Post a Comment