भाईंदर ते वसई रो रो सेवेचा खासदार राजन विचारे यांच्या हस्ते शुभारंभ



प्रतिनिधी - खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई रो -रो सेवा आज पासून सुरू करण्यात आली आहे. या रो रो सेवेचा शुभारंभ भाईंदर जेट्टी येथे खासदार राजन विचारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 


त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जंगम, अजित गंडोली, शेखर पाटील, जिल्हा संघटक स्नेहल सावंत, उप जिल्हा संघटक प्राची पाटील, शहर संघटक तेजस्वी पाटील, जिल्हा सचिव राजेश सिंह, शहर प्रमुख जितेंद्र पाठक, प्रशांत सावंत, उप शहर प्रमुख विनायक नलावडे, अशोक मोरे, आस्तिक म्हात्रे, मा. नगरसेवक, उप महापौर प्रवीण पाटील, ठामपा चे माजी नगरसेवक संजय दळवी, शाखाप्रमुख संतोष पोतदार, संदीप पाटील, संदीप तांबे, नरेंद्र उपरकर, उप शाखा प्रमुख उमेश आंबेरकर, उप शहर संघटक अस्मिता पाटील तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या रो-रो मार्गामुळे मीरा भाईंदर वासियांना हा सुखकर प्रवास सुरु झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी खासदार राजन विचारे यांचे आभार मानले आहेत. 


या रो-रो जेट्टी मुळे होणारे फायदे


मीरा भाईंदर मधील नागरिकांना वसई येथे रस्त्याने ४० किलोमीटरचा दिड तासाचा प्रवास करावा लागत होता व त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या प्रदूषणास आळा बसेल तसेच इंधनाचीही बचत होणार आहे हाच प्रवास आत्ता भाईंदर ते वसई साडेतीन किमीचा जलमार्ग प्रवास १५ ते २० मिनिटाचा असणार आहे. हा सुखकर प्रवास होत असल्याने नागरिक व पर्यावरण व पर्यटक प्रेमी या रो रो सेवेचा अधिक फायदा घेतील असे खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केले आहे.


पुढील प्रमाणे दर

मोटर सायकल चालकासह - 60 रुपये

रिकामी तीन चाकी रिक्षा मिनीडोर ( चालकासह) - 100 रुपये

चार चाकी वाहन (कारचालकासह)-180 रुपये

मासे, पक्षी, कोंबडी, फळे इत्यादी( प्रती टोपली) ,व कुत्रा, शेळी, मेंढी (प्रति नग)-40 रुपये

प्रवासी प्रौढ (12वर्षावरील )-30 रुपये

प्रवासी लहान( 3ते 12 वर्षापर्यंत)-15 रुपये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत