छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेच्या राजाला त्रिवार वंदन - प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे

 



शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन, शिवरायांचा जयघोष करत ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवजयंती साजरी


प्रतिनिधी ౹ ठाणेछत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्यातील सर्व कार्यकर्तांनी मासूंदा पुतळा येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेच्या राजाला मानाचे वंदन केले, अशी प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जय भवानी, जय शिवाजी असा शिवरायांचा जयघोष करत सोमवारी, १९ फेब्रुवारी २०२४ रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे मध्यवर्ती पक्ष कार्यालयामध्ये शिवप्रतिमेला व मासुंदा तलाव येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याला, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करून ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.


ठाणे महिला अध्यक्ष वनिताताई गोतपागर, माजी नगरसेविका अंकिता शिंदे,अल्पसंख्याक विभाग ठाणे अध्यक्ष प्रा. हुसेन मणियार, सामाजिक न्याय विभाग ठाणे अध्यक्ष मंगेश सुर्यवंशी, वैद्यकीय आरोग्य सेलचे अध्यक्ष अविनाश पवार, ठाणे सोशल मिडीया सेलचे अध्यक्ष कल्पेश मिठबावकर, जिल्हा सरचिटणीस रविंद्र पालव, परिवहन सदस्य नितिन पाटील, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे,  ब्लाॅक अध्यक्ष समिर पेंढारे, सुधाकर नाईक, निलेश फडतरे, कौस्तुभ धुमाळ, प्रविण खताळ, सुमित गुप्ता, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजित सावंत, संतोष सहस्रबुद्धे, दिनेश मेहरोल अतुल कदम, सचिन सुर्वे, मनोज कोकणे, ज्येष्ठ कार्यकर्ते दिपक पाटील, विश्वनाथ विचारे, प्रभाग अध्यक्ष साई प्रभू, साई सूर्यवंशी, सचिन गलांडे, आप्पा चव्हाण, , महिला विधानसभा अध्यक्ष वंदना खानोलकर, सुवर्णा खिल्लारी, अरुणा पेंढारे, युवती अध्यक्ष सोनिया माने, महिला पदाधिकारी मानसी चव्हाण, मनिषा कांबळे, शामा भालेराव, करिश्मा शिंदे, सुप्रिया शिंदे, स्नेहा चिपळूणकर, स्नेहा शिंदे,अनशु श्रीवास्तव, मनिषा कदम, माया केसरकर, शितल पवार, धनश्री उतेकर, विद्यार्थी पदाधिकारी हर्ष चापले, आदित्य घडसे, सोनू एडके आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत