मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आमदारांना निवेदन
ठाणे : प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी २० फेब्रुवारी विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण कायदा बनविण्यात येणार असून या कायद्याला सकारात्मक पाठिंबा देण्यासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती करणारे निवेदन आज ठाणे मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाने ठाण्यातील सर्व आमदारांना भेटून दिले.यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरक्षणाबाबत विशेष मार्गदर्शन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे मराठा समन्वयकांना दिले.
टिकणारे मराठा आरक्षण मिळावे, ओबोसिमधून आरक्षण देण्यात यावे आणि कुणबी मराठ्यांना सगे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणी तसेच त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक दिवसीय अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात आरक्षणाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती ठाण्यातील मराठा समन्वयकांनी आमदारांना केले. आमदारांच्या घरी आणि कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरी जाऊन निवेदन देण्यात आले. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे मुंबईला आणि भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे हे दिल्लीत असल्याने त्यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांची घरी भेट घेऊन मराठा कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आणि आरक्षणाबाबत काय अपेक्षा आहेत, याची मांडणी केली. त्यानंतर आव्हाड यांनी सत्य स्थिती आणि काय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रवीण पिसाळ, प्रवीण उतेकर, डॉ पांडुरंग भोसले, सुहास देसाई, तानाजी पोळ, रमेश चौधरी, प्रवीण गाढवे, नंदकिशोर शिंदे, पराग मुंबईकर, विश्वासराव पाटील, दीपक किर्देत, ज्ञानोबा कलंबे, ज्ञानेश्वर पराड आदी समन्वयक होते.

Post a Comment