साहित्यरत्न्ा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा
ठाणे, (जिमाका) :- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील 12 पोटजाती-मांग, मातंग, मिनीमादीग, मादींग, दानखणी मांग, मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांग-गारुडी, मांग-गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील 18 ते 50 या वयोगटातील दारिद्रय रेषेखालील (वार्षिक उत्प्ान्न्ा मर्यादा रु. 3,00,000/ पर्यंत) बेरोजगारांकरिता साहित्यरत्न्ा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये राज्य्ाशासनाच्या योजनांचा एनएसएफडीसी दिल्ली महामंडळाच्या योजनांचाही समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्याविषयी महामंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.
सन 2023-24 या वित्तीय वर्षाकरिता एनएसएफडीसी योजनेंतर्गत महामंडळाकरिता योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत ठाणे जिल्हयाकरिता देण्यात आलेले योजनानिहाय उदिदष्ट पुढीलप्रमाणे आहे-
एनएसएफडीसी सुविधा कर्ज योजना रु. 5.00 लाख, ठाणे जिल्ह्यासाठी 50 उद्दिष्ट आहे.
एनएसएफडीसी महिला समृध्दी कर्ज योजना रु. 1.40 लाख, ठाणे जिल्ह्यासाठी 40 उद्दिष्ट आहे.
एनएसएफडीसी शैक्षणिक कर्ज योजना देशांतर्गत अभ्यासक्रम रु. 30.00 लाख विदेशांतर्गत अभ्यासक्रम रु. 40.00 लाख
या सर्व योजनांचे कर्ज प्रस्ताव दि. 15 फेब्रुवारी 2024 ते 15 मार्च 2024 या कालावधीत महामंडळाच्या वेबसाईट प्रणाली (Portal) https://beta.slasd.org द्वारे स्विकारले जातील.
तसेच महामंडळाच्या थेट कर्ज योजना (प्रकल्प्ा रक्कम रु. 100000/-) मध्ये सन 2023-24 या वित्तीय वर्षातील शिल्ल्ाक 34 भौतिक उद्दिष्टाकरिता इच्छुक अर्जदारांनी दि. दि. 15 फेब्रुवारी 2024 ते 15 मार्च 2024 या कालावधीत महामंडळाच्या ठाणे जिल्हा कार्यालयात कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह कर्ज प्रस्ताव दाखल करावेत.
कर्ज प्रस्ताव सादर केल्यानंतर महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार मंजूरी संदर्भातील आवश्य्ाक कार्यवाही करण्यात येईल. तरी अधिक माहितीकरिता जिल्हा व्य्ावस्थापक, साहित्य्ारत्न्ा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय, 5 वा मजला, कोर्टनाका, ठाणे (प.) 400604 दूरध्वनी क्र. 022- 25388413 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

Post a Comment