स्वराज्य ज्योतीचे ठाणे शहरामध्ये जल्लोषात स्वागत - प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे

 



प्रतिनिधी ౹ ठाणे-शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित स्वराज्य सप्ताहानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, वंदन करून मार्गस्थ झालेल्या स्वराज्य ज्योतीचे मंगळवारी ठाणे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे.


सोमवारी, १९ फेब्रुवारी-२०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. शिवजयंतीनिमित्त, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष, खासदार सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवारी, १२ फेब्रुवारी-२०२४ ते रविवारी, १८ फेब्रुवारी-२०२४ या कालावधीमध्ये 'स्वराज्य सप्ताह' चे आयोजन करण्यात आले आहे.


सोमवारी, १२ फेब्रुवारी-२०२४ रोजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथील्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, वंदन करून स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका मार्गस्थ झाली. या स्वराज्य ज्योतीचे व स्वराज्य पताकाचे मंगळवारी, १३ फेब्रुवारी-२०२४ रोजी, ठाणे शहरातील आनंदनगर जकात नाका येथे ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. येथून वाजतगाजत, फटाक्यांची आतिषबाजी करत, गुलाब पाकळ्या उधळत, शिवाजी महाराजांचा जयजयकार करत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगवे फेटे घातलेल्या ५०० बाईकस्वारांनी ठाणे शहरातुन स्वराज्य ज्योतीची मिरवणूक काढली. ही स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका आनंद नगर जकात नाका ते तीन हात नाका येथून नितीन कंपनी ते अल्मेडा रोड ते गजानन महाराज चौक येथून तलाव पाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, वंदन करून, टेंभी नाका ते सिव्हील हॉस्पिटल ते सेंट्रल मैदान ते कळवा नाका येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, वंदन करून अमित गार्डन (कळवा- रेतीबंदर) येथून प्रवास करत कल्याणच्या दिशेने मार्गस्थ झाली. ही स्वराज्य ज्योत शिवकालीन आणि इतिहासाने प्रेरित असलेल्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळावरुन फिरविण्यात येणार आहे, असे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्याक विभाग निरिक्षक नजीब मुल्ला, ठाणे महिला अध्यक्ष वनिताताई गोतपागर, ठाणे युवक अध्यक्ष विरु वाघमारे, कार्याध्यक्ष संदेश पाटील, ठाणे विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, ठाणे हिंदी भाषिक सेलचे अध्यक्ष राजनाथ यादव, ठाणे आरोग्य सेलचे अध्यक्ष अविनाश पवार, कार्याध्यक्ष रोहन जाधव, माजी नगरसेवक वहिदा खान, अंकिता शिंदे, रिटा यादव, प्रकाश बर्डे, अजिज बाटा, ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, उपाध्यक्ष तकी चेऊलकर, परिवहन सदस्य नितिन पाटील, मोहसिन शेख, विधानसभा अध्यक्ष अजय सकपाळ, विधानसभा कार्याध्यक्ष निलेश कदम, ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजित सावंत, जयवंतराव पाटकर, दिनेश मेहरोल, मिलिंद डिचोलकर, ब्लॉक अध्यक्ष निलेश फडतरे, शंकर कोळेकर, समिर पेंढारे, सुधाकर नाईक, कौस्तुभ धुमाळ, ब्लॉक कार्याध्यक्ष सुमित गुप्ता, महिला विधानसभा अध्यक्ष सुवर्णा खिल्लारी, वंदना खानोलकर, अरुणा पेंढारी, महिला ब्लॉक अध्यक्ष पल्लवी गिद, युवती अध्यक्ष सोनिया माने, झारा शेख, विधानसभा युवक अध्यक्ष जसबीर शेख 

आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत