विजय त्रिपाठी यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती

 


ठाणे - ठाण्यातील भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विजय त्रिपाठी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यावेळी उपस्थित होते. संपर्क ते समर्थन अभियान अंतर्गत ६०० घरी संवाद प्रवास करून नमो अँप डाउनलोड करावे आणि जास्तीत जास्त लोकांना ब्रँड अँबेसिडर करावे अशी अपेक्षा  चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय त्रिपाठी यांच्याकडे व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत