अंतरिम अर्थसंकल्प समृद्ध व सर्वसमावेशक भारत निर्माण करण्यासाठी - सुजाता सोपारकर, अध्यक्षा- ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन
अंतरिम अर्थसंकल्प समृद्ध व सर्वसमावेशक भारत निर्माण करण्यासाठी व अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी पोषक आहे. विशेषतः गरीब,महिला,युवा आणि अन्नदातासाठी सक्षमीकरणाची व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देणारा आहे. 2024 च्या विकसित भारताचे स्वप्न साकार होतांना दिसते .
सुजाता सोपारकर, अध्यक्षा- ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन
एकाच वेळी ई-चार्जिंग नेटवर्कचा विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये सततच्या भांडवल वृद्धीमुळे उद्योगाला चांगल्या ऑर्डर्स मिळतील. मध्यमवर्गीयांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २ कोटी नवीन घरे करण्याची सरकारची योजना असल्याने गृहनिर्माण क्षेत्रातही चांगली वाढ होईल.
त्यांनी 2009-2010 पर्यंत रु. 25000 पर्यंतच्या आणि रु 10,000 पर्यंतच्या 2010-11 ते 2014-15 ह्या आर्थिक वर्षापर्यंत आयकर खात्याच्या मागण्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने याचा 10 दशलक्ष लोकांना फायदा होईल व ते तणावमुक्त होतील .
काही आयात अधिसूचनांची वैधता आणि स्टार्ट अप्सवरील प्रोत्साहन योजनेची मुदत मार्च 2025 पर्यंत वाढवल्याने सातत्य राखन्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल आहे.
एकूणच अंतरिम अर्थसंकल्पाने वाढत्या अर्थव्यवस्थेचा पाया घातला आहे.
Post a Comment