flowers

छत्रपती शिवाजी महाराज यांना यशवंतराव चव्हाण सभागृह, जि. प. ठाणे येथे अभिवादन

 



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज यशवंतराव चव्हाण सभागृहात, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत प्रकल्प संचालक श्रीम. छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


पोवाडा व गाणी सादर करीत कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मा. प्रकल्प संचालक श्रीम. छायादेवी शिसोदे यांनी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व महाराजांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे सांगितले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत