पत्रकार कक्षात शिवजयंती उत्साहात साजरी
ठाणे - महापुरूषांचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा देत असते. जयंती साजरी करण्यामागे महापुरुषांची शिकवण आत्मसात करावी, हाच उद्देश असतो, असे प्रतिपादन ठामपाचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले.
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने ठामपा पत्रकार कक्षात प्रथमच शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रशांत रोडे बोलत होते. या प्रसंगी उपायुक्त बिरारी, गुंडप, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर आदी उपस्थित होते.
रोडे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजीमहाराज यांनी कोण्या एका धर्माचे राज्य स्थापन केले नाही. तर अठरापगड जाती , बलुतेदार यांना एकत्र करून रयतेचे राज्य स्थापन केले. त्यांचे सबंध चरित्र हे आपणा सर्वांना आदर्शवत आहे.
अध्यक्षिय मनोगतात आनंद कांबळे यांनी, शिवरायांनी आपणाला स्वाभिमान शिकवला आहे. पत्रकार म्हणून आपण हा स्वाभिमान अंगीकारला पाहिजे, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भालेराव यांनी केले.
या कार्यक्रमास ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विकास काटे, खजिनदार विभव बिरवटकर, सहसचिव गणेश थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment