महिला-बालकांसाठीच्या योजनांच्या शिबिराला प्रतिसाद भाजपातर्फे माजी नगरसेविका नम्रता कोळी यांच्यातर्फे आयोजन
ठाणे, (प्रतिनिधी) : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने भाजपाच्या माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी व शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी आयोजित केलेल्या महिला व बालकांसाठीच्या शासकीय योजनांच्या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
केंद्र व राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ महिला व बालकांपर्यंत पोचविण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्र मंडळाच्या सभागृहात विशेष शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसाठी पाच बालकांची नोंदणी करण्यात आली. तर महिलांना स्वयंरोजगार-विद्यावेतन योजनेखाली अनुदान मंजुरीसाठी ६८ महिलांनी अर्ज केले.
या शिबिराला भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे, डॉ. समीरा भारती यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या शिबिरासाठी भारतीय जनता पार्टी प्रभाग अध्यक्ष प्रतिक सोलंकी, ओ बी सी उपाध्यक्ष नरेश ठाकूर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मिनाक्षी मिस्त्री, रश्मी मोरे, युवा मोर्चा नौपाडा मंडळ अध्यक्ष राहुल कुंड, अल्पसंख्यक जिल्हा महिला अध्यक्षा नीखत सारंग, रमाई महिला मंडळ अध्यक्षा मेघना अडसुळे, महिला मोर्चा सचिव सिद्धी मिस्त्री, नौपाडा मंडळ उपाध्यक्षा सुनिता भोईर, नौपाडा मंडळ सचिव राणी मेमन, अल्पसंख्यक मंडळ अध्यक्षा निलोफर शेख, शक्तीकेंद्र प्रमुख नितेश तेली, प्रकाश करजावकर, अखिलेश कर्वे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
.png)
Post a Comment