flowers

कु. अली समीर शेख याला ४०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक



राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सहचिटणीस नजीब मुल्ला यांनी केले कौतुक

प्रतिनिधी ౹ ठाणे -कु. अली समीर शेख याने ४०० मीटर अडथळा शर्यतीत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सहचिटणीस नजीब मुल्ला यांनी त्याचे या उत्कृष्ट कामिगीरी केल्याबद्दल कौतुक केले आहे.


२७ ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत चंद्रपूर येथे १९ वर्षांखालील,


७ वी राष्ट्रीय शालेय ऍथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी समीर शेख यांचा मुलगा कु. अली समीर शेख याने ४०० मीटर अडथळा शर्यतीत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक,व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी कु. अली समीर शेख याचे ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्कृष्ट कामिगीरी केल्याबद्दल कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत