मो.ह. विद्यालयातील सौर ऊर्जा प्रकल्प व जनजागृती केंद्राचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे, - जनरल एज्युकेशन इन्टिट्यूटचे मो.ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे आयोजित गुरुवर्य स.वि. कुलकर्णी सौर ऊर्जा प्रकल्प व जनजागृती केंद्राचे लोकार्पण गुरुवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी व्यासपिठावर डॉ. संजय मंगला गोपाळ, सौ. लतिका सुप्रभा मोतिराम, माजी शिक्षक सुबोध देशपांडे, उषा केळकर, संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, कोषाध्यक्ष रवींद्र तामरस, कार्यवाह अधटराव, मुख्याध्यापिका नीलांबरी जठार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. संजय मंगला गोपाळ, सौ. लतिका सुप्रभा मोतिराम यांनी दिलेल्या देणगीतून मो.ह. विद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहिला आहे. या प्रकल्पामुळे शाळेच्या वीज वापरात बचत होणार असून परिणामी वीज बिल कमी येणार आहे.
यावेळी मेधाताई पाटकर म्हणाल्या की, पृथ्वी आज जळत आहे म्हणून हिमालय ढासळत आहे. ऊर्जाधारीत विकास थांबल्या शिवाय, तो कमी कमी करत गेल्या शिवाय सूर्य काय चंद्रसुध्दा नवी संसाधने मिळवून देणार नाही. अशा परिस्थितीत शाश्वत विकासाचे मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. जिथे जिथे आपल्या आयुष्यात ऊर्जा वाचवता येईल तिथे तिथे वाचवावी. आणि जिथे जिथे मनुष्य ऊर्जेचाच उपयोग करता येईल तिथे तिथे तो करावा.
आज ग्रीन शब्द काळा झाला आहे. शेती बुल्डोजरने तुडवून एअरपोर्ट बनविले जात आहेत. त्याला ग्रीन फिल्ड एअरपोर्ट असे नाव दिले जात आहे. नैसर्गीक शक्तींच्या संसाधनावर आज कोट्यवधी जनता जगते आहे. कोरोना काळात सगळ्यांनी बघितले आहे की, केवळ पैसा असून जीव वाचवता येत नाही. प्राणवायुच जीवन देतात. आज मो.ह. विद्यालयाने एक उद्देश ठेऊन लाख मोलाचे कार्य केले आहे. आपले स्वप्न संजय मं.गो. आणि लता सु.मो. यांच्या देणगीच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविले आहे. माझा सलाम असल्याचे सांगत मेधाताई पाटकर यांनी दोघांचे आणि शाळेचे कौतुक केले. तसेच हा प्रकल्प प्रेरणादायी असून समाजापुढे आणावा आणि प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सुत्रसंचालन सौ. स्नेहा शेडगे यांनी केले.

.jpeg)
Post a Comment