मुंब्र्यात जितेंद्र आव्हाड यांना जोरदार धक्का, शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
राष्ट्रवादीबरोबर पुन्हा जोडले गेले, त्याचा आनंद व अभिमान- प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे
मुंब्र्यातील कार्यकर्त्यांच्या 'फिरसे आझादी'चे स्वागत - प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला
प्रतिनिधी ౹ ठाणे-मुंब्रा परिसरातील शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक राजू अन्सारी, विश्वनाथ भगत, अझिज शेख (उर्फ बाटा) यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या जाहिर प्रवेशामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जोरदार धक्का बसला आहे. या कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे स्वागत करताना, राष्ट्रवादीबरोबर पुन्हा जोडले गेले, त्याचा आनंद व अभिमान असल्याची प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली तर मुंब्र्यातील कार्यकर्त्यांच्या 'फिरसे आझादी' चे स्वागत करत असल्याचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी २ जुलै रोजी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यावर मी व नजीबभाई यांनी अजितदादांबरोबर रहाण्याचा निर्णय घेतला. मुंब्र्यामधील शेकडो कार्यकर्त्यांनी विकासाच्या मुद्यावर पुन्हा राष्ट्रवादीबरोबर जोडण्याचा घेतलेल्या निर्णयाचा आनंद व अभिमान वाटतो. मुंब्र्यातील लोकांना आता पाणी, वीज, कचरा, साफसफाईवरुन कोणी त्रास देणार नाही. विचारधारा व सेवा याच्यावर आधारित, मुंब्र्यात पुन्हा राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद उभी करु. लवकरच मोठा मेळावा घेऊन मुंब्र्यात शक्तिप्रदर्शन करु असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. तर नवीन वर्षात दादागिरीला प्रेमाच्या संदेशाने उत्तर देऊ आणि मुंब्र्यातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी खिदमतगार असून मला एक कॉल करा, व्हॉट्सअप मेसेज करा, प्रश्न तत्काळ सुटलेला असेल. मुंब्र्यातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या या फिरसे आझादीचे स्वागत करतो अशी प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली.
यावेळी सय्यद जावेद, आयतुलहक अन्सारी, जाफर मेमन, मोहसिन इब्राहिम शेख, सुलतान शेख, फैयाज खान, जैद सय्यद, जाकीर शेख, मोहसिन शेख, जावेद सय्यद, सुलतान खान, आमीन शेख, अनिस शेख, इफ्तिखार शेख, परवेश मलिक, एजाज शेख, मुक्तार अहमद, रफीक अन्सारी आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची शाल गळ्यात घालून व पुष्पगुच्छ देवून या सर्वांचे मनापासून पक्षात स्वागत केले. यावेळी ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, परिवहन सदस्य मोहसीन शेख, ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विरु वाघमारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव परवेज चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Post a Comment