थर्टीफास्टला उत्पादन शुल्क विभागला 'लक्ष्मीदर्शन ' - दारू परवाण्यातून 12 लाख 64हजाराचे उत्पन्न
सोसायट्या, लॉन, रिसॉर्ट आणि वैयक्तिक पार्ट्यांमध्ये दारू पिण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या एका दिवशीय परवानातून या विभागाला तब्बल 12 लाख 64 हजार रुपयांचे लक्ष्मी दर्शन झाले आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागने
जिल्ह्यातील 60 जणांना असे परवाने दिले होते. या परवानाचे शुल्क म्हणून या विभागाला ही रक्कम मिळाली आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी दारूच्या पार्ट्या केल्या जातात. रिसॉर्ट, लॉन, सोसायटी आदी ठिकाणी अशा पार्ट्या होतात. या पार्ट्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारू पिण्यासाठी एका दिवसाचा परवाना दिला जातो. त्यासाठी शुल्कही आकारले जाते. राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाकडून कमर्शियल करिता 22000 आणि वैयक्तिक पार्टी करिता 7700 रुपयांचे शुल्क आकारले जाते. ठाणे जिल्ह्यातून अशा प्रकारचे 60 परवाने वितरित करण्यात आले होते. त्यामधून राज्य उत्पादन शुल्क विभागाला 12 लाख 64 हजार 700 रुपयांचे उत्पन्न मिळाले. अशी माहिती ठाणे विभागाकडून देण्यात आली.

Post a Comment