कारागृह कैद्यांना मिळाली हायटेक सुविधा ,अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले उद्घाटन
राज्यभरातील कारागृहात बंदिस्त असलेल्या बंद्यांना हायटेक सुविधा देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. तसे आदेश कारागृह प्रशासनाला देण्यात आल्याने राज्याचे अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते या उपक्रमाचे ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात उद्घाटन झाले.
राज्यातील कारागृह हे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण नसून कैद्यांनाही सुधारण्याची संधी मिळावी यासाठी राज्याचे गृह खाते आणि कारागृह प्रशासन प्रयत्नशील असते. याच प्रयत्नान्वये आता राज्यभरातील कैद्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा हायटेक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कैद्यांना कारागृहातच बायोमेट्रीक टच स्क्रीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेनुसार कैद्यांना आता एका क्लिकवर स्वतःच्या बाबतीतील सद्यस्थिती जाणून घेता येणार आहे. अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक यांनी बुधवार (ता.२४) रोजी या सुविधेचे उद्घाटन केले. या प्रसंगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात डी.टी.डाबेराव, उपअधीक्षक, के.पी.भवर,वरिष्ठ तुरुंगाधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
त्यानुसार ही प्रणाली महाराष्ट्रातील सर्व कारागृहात लागू करण्यात आलेली आहे. या प्रणालीच्यामाध्यमातून कारागृहातील बंदीस्त कैद्यांना ई-मुलाखत (ई-प्रिझन्स प्रणालीतील) या सुविधेचे लाभ देण्यात येत आहे. कारागृहातील कैद्याना त्यांच्या नोतवाईकांसोबत तसेच त्यांच्या वकीला सोबत ऑनलाईन मुलाखती सुरू करण्यात आलेल्या आहेत. या सुविधेच्या माध्यमातून कैद्यांच्या नातेवाईकाना व वकिलांना ई-मुलाखत ॲपव्दारे काही दिवस अगोदर मुलाखत आरक्षित करता येवू शकरणार आहेत.
* कारागृहात दाखल होताना बंद्यांची संपूर्ण माहिती बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जाते.
त्यामुळे कारागृहात ठेवलेल्या बायोमेट्रीक टच स्क्रीन यंत्रावर कैद्याने अंगठा ठेवताच त्याला त्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसणार आहे.
* ठाणे कारागृहात मध्यवर्ती ठिकाणी हे यंत्र बसवण्यात आले आहे. सध्या या कारागृहात सुमारे ४२०० कैदी बंदिस्त आहेत. त्या सर्वांना ही सुविधा सोयीची झाली आहे. पूर्वी त्यांना त्यांची पुढील कोर्ट तारीख, मुलाखत जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी त्यांना एक नंबर दिला जायचा. त्या नंबराच्या आधारे कारागृह प्रशासनाकडून त्याला ती माहिती मिळायची. मात्र यासाठी कारागृह प्रशासनाचा बराच वेळ खर्ची पडत असेल. शिवाय कैद्यांनाही तो नंबर सांभाळून ठेवणे कठीण होत असे. आता मात्र नंबर जपून ठेवण्याची गरज नसून फक्त टच स्क्रीनवर अंगठा ठेवला तर संपूर्ण माहिती उपलब्ध होत आहे.
* अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्विकारल्यापासून कारागृहातील कैद्यांकरीता कियॉस्क मशिन, स्मार्ट फोन कॉल सुविधा, शिक्षाबंदी गळाभेट योजना, ई - मुलाखत सुविधा, उपहारगृह रक्कम खर्च रकमेत वाढ, वय वर्षे -३०वरील कैद्यांना बेडींग सुविधा, वॉशिंग मशिन सुविधा, बेकरी विभागाकरीता आधुनिक उपकरणांची खरेदी इत्यादी स्तुत्य उपक्रम सुरु केले आहेत.
* या उपक्रमाला ठाणे कारागृहातील कैदी आणि त्यांच्या नातेवाईकांना चांगली सुविधा मिळणार आहे. कारागृह प्रशासनाला वेळ न दवडता कैद्यांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर कधीही पाहता येणार आहे. यासाठी मनुष्य बळावरील ताण देखिल कमी होणार आहे.
- राणी भोसले, अधीक्षक,ठाणे मध्यवर्ती कारागृह

Post a Comment