ठाणे न्यायालयात हृदय विकाराच्या झटक्यात पोलिसाचा मृत्यू
कासारवडवली पोलीस ठाण्यात असिस्टंट सब इन्स्पेक्टर कर्तव्यावर असणारे सुनील रघुनाथ खैरे यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. ठाणे सत्र न्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी गेले असता त्यांना हृदय विकाराचा झटका आला. तेथील कर्मचाऱ्यांनी त्वरित त्यांना रुग्णालयात नेले मात्र तत्पूर्वी ते मयत झाले होते.
हवालदार सुनील खैरे (वय ५४) हे सध्या घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली पोलीस ठाण्यात असिस्टंट सब इन्स्पेक्टर या पदावर कर्तव्यावर होते. बुधवारी (ता.२४) ते गुन्हे संबंधी न्यायालयीन कामासाठी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात गेले होते. काम आटोपून ते पोलीस ठाण्याकडे निघाले असता न्यायालयातच त्यांना छातीत चमका येऊ लागल्या. ही बाब तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना चरई येथील कुंबला रुग्णालयात नेले. मात्र तेथे ते मयत ते असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात शव विच्छेदन झाल्यानंतर त्यांचे शव जुन्नर जवळ असलेल्या नारायण गाव त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले.

Post a Comment